Archana Patil BJP | बिल्डर भरत नसलेल्या मिळकत कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर का?  | भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

HomeBreaking News

Archana Patil BJP | बिल्डर भरत नसलेल्या मिळकत कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर का? | भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

Ganesh Kumar Mule Feb 19, 2026 10:29 AM

Dr. Ambedkar Thoghts | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या चित्रसृष्टीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते
Archana Patil : Lahuji Vastad Salve : पुणे महापालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र! : नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या  बैठकीसह मुख्य सभेची मान्यता
Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Archana Patil BJP | बिल्डर भरत नसलेल्या मिळकत कराचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर का?

| भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

 

Pune Property Tax – (The Karbhari News Service) – महापालिका मिळकत कर विभागाकडून शहरातील नवीन मिळकतीचे मूल्यमापन केले जात नाही. वर्षानुवर्षे हे काम तसेच असते. दरम्यान त्याचा कर हा बिल्डरने भरणे अपेक्षित असते. मात्र जेव्हा तो फ्लैट किंवा मिळकत बिल्डर विकतो, तेव्हा त्याचा भुर्दंड हा घर मालकांना बसतो. यावर उपाय योजना कराव्यात. अशी मागणी नगरसेविका अर्चना पाटील यांनी मुख्य सभेत केली. (PMC General Body Meeting)

मिळकत कराच्या दर वाढीला सर्वपक्षीय नगरसेवकानी मुख्य सभेत विरोध केला. त्यावेळी अभिनंदन पर प्रस्तावावर बोलताना पाटील यांनी मिळकत करायच्या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले.

पाटील म्हणाल्या, प्रशासनाकडून मिळकतीचे मूल्यमापन करण्यात कसूर केली जाते. बिल्डर बांधकाम करतो. त्याला कंप्लिशन दिले जाते. बिल्डरकडून काही फ्लॅट विकले जात नाहीत. काही वर्ष तो तसाच पडून असतो. या मधल्या काळाचा कर बिल्डरने भरणे अपेक्षित असते. मात्र जेव्हा कुणी नागरिक तो फ्लैट विकत घेतो, तेव्हा मधल्या काळातील कर भरण्याचा बोजा त्याच्यावर येतो. यावर आळा बसायला हवा आहे.

| मिळकत कराचे चेक बाऊन्स करून महापालिकेचे पैसे वापरणाऱ्या लोकांना अटकाव घाला

पाटील यांनी सांगितले की, काही बडे लोक मिळकत कर जमा करताना चेक देतात. हे चेक लाखो आणि करोडोत असतात. मात्र हे चेक बाऊन्स होतात. पुन्हा त्याची प्रक्रिया करण्यास वेळ जातो. म्हणजे हे लोक किमान वर्षभर महापालिकेचा पैसा वापरत राहतात. यावर महापालिका प्रशासनाने अटकाव घालावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

पाटील यांनी पुढे म्हटले की, सर्वसामान्य नागरिकांवर जास्त कर लावावा लागणार नाही, यावर प्रशासनाने काम करायला हवे. झोपडपट्टी परिसरातील लोकांकडून तुम्ही कर गोळा करता, मात्र त्यांना तुम्ही किती सुविधा देता? आधी त्यांना सुविधा द्या. असे देखील पाटील यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: