Deputy Commissioners : PMC : महापालिकेत दोन उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती 

HomeपुणेBreaking News

Deputy Commissioners : PMC : महापालिकेत दोन उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती 

Ganesh Kumar Mule Apr 07, 2022 6:33 AM

New Member of Standing Committee : PMC : स्थायी  समितीच्या  नवीन  8  सदस्यांची  निवड  सोमवारी!   : खास  सभेत  होणार  निवड 
PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
PMC : Hemant Rasne : स्थायी समितीच्या बैठकीत हे झाले महत्वाचे निर्णय!

महापालिकेत दोन उपायुक्तांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : पुणे महापालिका दोन नवीन उपायुक्तांची नियुक्ती प्रतिनियुक्तीने करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त यांनी जारी केले आहेत.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणारे सचिन इथापे यांची महापालिकेत उपायुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील इंदलकर यांची बदली झाल्यापासून सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज उपायुक्त राजेंद्र मुठे यांच्याकडे देण्यात आले होते.

तसेच राज्य सरकारकडे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे यशवंत माने यांची देखील उपायुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे निवडणूक विभाग, पर्यावरण विभाग, आकाशचिन्ह व परवाना विभाग या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडणूक विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे होती.