Transfer | PMC | आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या!   | प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

HomeUncategorized

Transfer | PMC | आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या! | प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

Ganesh Kumar Mule Apr 13, 2023 4:45 AM

Sanitation | बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!
PMC Illégal Construction Action | कोंढवा, लोहगांव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 33 हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्र हटवले
NAAC Committee | अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयास उद्या नॅक कमिटीची भेट

आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या!

| प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश

पुणे | महापालिका प्रशासनाने बदल्या करण्याची बाब गंभीरपूर्वक घेतली आहे. नुकतेच 132 कनिष्ठ अभियंता यांच्या बदल्या केल्यानंतर अजून 646 सेवकांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश आहे.  यानियतकालिक बदल्यांची तसेच पदस्थापनेची कार्यवाही 17 एप्रिल ला केली जाणार आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील ज्या सेवकांची एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झाली आहे, अशा सेवकांच्या अन्य खात्यात बदल्या कराव्या लागतात. खात्याच्या एकूण पदांपैकी
दरवर्षी जास्तीत जास्त २०% अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या कराव्यात, अशा बदल्या करणेविषयीच्या धोरणानुसार  ३१/०३/२०२३ अखेर एकाच खात्यात तीन वर्षे अगर त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या लेखनिक संवर्गातील प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक या पदावरील सेवकांची नियतकालिक बदल्या तसेच लेखनिक संवर्गातील उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक व अभियांत्रिकी संवर्गातील शाखा अभियंता या पदाच्या पदस्थापना करण्याची कार्यवाही अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांचे अध्यक्षतेखाली प्रस्तावित केलेली आहे.

या  नियतकालिक बदल्या व पदस्थापना करण्याची कार्यवाही सोमवार, १७/०४/२०२३ रोजी जुना जी.बी. हॉल, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, तिसरा मजला, येथे होणार आहे.
– हे आहेत सेवक
शाखा अभियंता – 18 – पदस्थापना कार्यवाही
प्रशासन अधिकारी – 4  – बदली कार्यवाही
उप अधिक्षक – 43 – बदली कार्यवाही
उप अधिक्षक – 56 – पदस्थापना कार्यवाही
लिपिक टंकलेखक – 274 – बदली कार्यवाही
वरिष्ठ लिपिक – 112 – बदली कार्यवाही
वरिष्ठ लिपिक – 139 – पदस्थापना कार्यवाही