Amol Balwadkar | बाणेर परिसरात निवेदन जाळून केले आंदोलन |अमोल बालवडकर यांचा आक्रमक पवित्रा 

HomeपुणेBreaking News

Amol Balwadkar | बाणेर परिसरात निवेदन जाळून केले आंदोलन |अमोल बालवडकर यांचा आक्रमक पवित्रा 

गणेश मुळे Aug 04, 2024 10:31 AM

Baner:Balewadi : बाणेर-बालेवाडी संपूर्ण प्रभाग प्रकाशमान करणार! : नगरसेवक अमोल बालवडकर
Amol Balwadkar : Sus-Mahalunge : सुस-म्हाळुंगेचा अतिशय नियोजित असा विकास करणार : अमोल बालवडकर  : म्हाळुंगे मुख्य रस्त्याचे भुमिपुजन संपन्न
Pandharpur Wari| अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वारकरी सेवेची २९ वर्षे!

Amol Balwadkar | बाणेर परिसरात निवेदन जाळून केले आंदोलन |अमोल बालवडकर यांचा आक्रमक पवित्रा

 

Baner Balewadi Traffice issue – (The Karbhari News Service) – बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे आणि पाषाण येथील नागरिकांच्या समवेत आज परिसरातील ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आणि पर्यायी रस्त्यांचे काम करण्यासाठी प्रशासनाच्या विरोधात बाणेर येथील राधा चौकामध्ये अनेक महिला  व नागरिकांच्या उपस्थितीत भर पावसात माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.

परिसरातील रस्ते खड्डेमुक्त करणे, ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, बॅरिकेड बसविणे, NH-4 येथे नवीन अंडरपास होणे, NH-4 सर्विस रस्ता सुधारणे, बालेवाडी- वाकड रस्ता लवकर सुरू करणे, म्हाळुंगे- नांदे रस्ता सुधारणे आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करणे यासाठी हे  निषेध आंदोलन करण्यात आले.

जबाबदार अधिकारी आज उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे निवेदन जाळून त्यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या मागण्या या कायमच राहतील आणि जेव्हा जेव्हा वेळ पडेल तेव्हा नागरिकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावेळी बालवडकर यांनी दिला आहे.