AI Training in PMC | पुणे महानगरपालिकेत Ai प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – ज्ञान व विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरामध्ये तंत्रज्ञानामुळे अमुलाग्र बदल झालेला आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation – PMC) देखील शासकीय कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सज्ज झाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) प्रभावी वापराने शासकीय कामकाजाला गती देण्याचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ‘प्रशिक्षण प्रबोधिनी आणि माहिती तंत्रज्ञान विभाग पुणे महानगरपालिका’ यांच्या संयुक्त विद्यमाने AI प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. (Pune PMC News)
राज्यशासनाच्या ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून ही कार्यशाळा दिनांक ४ एप्रिल व ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. जलद सेवा देण्यासाठी आणि प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी कामकाजाला तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.
Artificial Intelligence विषयात Ph.D आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रगल्भ अनुभव असणारे प्रशिक्षक डॉ. भूषण केळकर, डॉ. अमेय पांगारकर आणि डॉ. मधुरा केळकर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना Ai चे प्रशिक्षण दिले. सदर कार्यशाळेला सर्व खाते प्रमुख, वर्ग १ आणि वर्ग २ चे अधिकारी, आरोग्य अधिकारी असे एकूण ३६७ अधिकारी उपस्थित होते. या तज्ञांनी AI चा शासकीय कामकाजात योग्य वापर कसा करावा, त्याचे महत्त्व आणि त्याद्वारे कार्यक्षमता कशी वाढवावी, यावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. “AI हे फक्त तंत्रज्ञान नाही, तर ती कामकाजातील क्रांती आहे,” असे मत श्री. डॉ. भूषण केळकर यांनी मांडले. या तिन्ही प्रशिक्षकांनी AI चा वापर आणि गैरवापर यातील फरक समजावत AI ची उपयुक्तता अधोरेखित केली. विशेषतः AI चा स्वीकार (acceptance) करून त्यात प्रावीण्य (excellence) कसे मिळवता येईल, यावर त्यांनी विशेष प्रबोधन केले. प्रशिक्षकांच्या तज्ञ आणि अनुभवी दृष्टिकोनामुळे तसेच अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणा दरम्यान प्रत्यक्षात विविध Ai tools चा वापर केल्यामुळे ही कार्यशाळा अधिक प्रभावी ठरली.
शासकीय कामकाजात AI चा वापर करून कार्यक्षमता वाढवणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कागदपत्रांचे व्यवस्थापन, डेटावर आधारित निर्णय घेणे आणि प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे यासाठी AI कसे मदत करू शकते, हे यातून स्पष्ट झाले. यामुळे वेळेची बचत होईल आणि नागरिकांना चांगली आणि जलद सेवा मिळेल.
अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) प्रदीप चंद्रन (M J Pradip Chandren IAS), अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पृथ्वीराज बी.पी. (Prithviraj B P IAS) यांनी केलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे या कार्यशाळेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. तसेच मा. उप आयुक्त राजीव नंदकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राहुल जगताप (Rahul Jagtap PMC) (सिस्टम मॅनेजर, पुणे महानगरपालिका) यांनी व्यक्त्यांचा परिचय करून दिला तसेच व्यक्त्यांचे आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले. सदर कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला.
COMMENTS