Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  शिवसेना पुणे (UBT) चे आंदोलन 

Homeagriculture

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  शिवसेना पुणे (UBT) चे आंदोलन 

Ganesh Kumar Mule Apr 07, 2025 8:31 PM

PMC Special Student School | विशेष विद्यार्थिनी आकांक्षा किशोर पेडगावकरचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान!
Kondhawa yevlewadi Ward office | कोंढवा येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालयाचे जनजागृती व स्वच्छता अभियान | १६१५ किलो कचरा गोळा करण्यात आला
Maratha Kranti Morcha | वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याच्या मागणीला मराठा क्रांती मोर्चा चा पाठींबा 

Manikrao Kokate | कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात  शिवसेना पुणे (UBT) चे आंदोलन

 

Shivsena UBT Pune – (The Karbhari News Service) – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विषयात केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे शहर पक्षाच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन लालमहल चौक येथे करण्यात आले.

 

महाराष्ट्र हा शेतीप्रधान आहे आणि नेहमी सत्ताधारी हे शेतकऱ्यांची चेष्टा लावल्यासारखे वक्तव्य करीत असतात शेतकरी सक्षमीकरणासाठी हे सरकार काम करीत नाही हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते हे सरकार सामान्य माणसाचे नसून हे व्यापाऱ्यांचे आहे असा रोष शिवसैनिकांनी व्यक्त करून निषेध नोंदवला. महिला शिवसैनिकांनी जोडे मारले, कृषिमंत्री हा शेतकऱ्यांचा आणि सरकारचा दुवा असतो पण कोकाटे हा कृषिमंत्री म्हणून कलंक आहे असे यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले.

यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख आबा निकम, शहर संघटक राजेंद्र शिंदे, उमेश वाघ, किशोर राजपूत, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेनेचे शहर संघटक राम थरकुडे, जिल्हा अधिकारी युवती सेना निकिता मारटकर, विभाग प्रमुख सूरज लोखंडे, मुकुंद चव्हाण, अजय परदेशी, संतोष भुतकर, रूपेश पवार, अमर मारटकर, जितू निजामपूरकर, अतुल दिघे, शिव आरोग्य सेना रमेश क्षिरसागर, दिलीप पोमण, आशिष अढळ, तुषार भोकरे, गणेश घोलप, नागेश खडके, दत्तात्रय करपे, बकुळ ढाखवे, तानाजी पवळे, अनिल परदेशी, इम्रान खान, राहुल शेडगे, नितीन दलभंजन, वाहतूक सेनेचे सूरज खंडागले, राजेश माने, सचिन घोलप, बाळासाहेब गरुड, मिलिंद पत्की, महिला आघाडीच्या रोहिणी कोल्हाळ, अमृत पठारे, वैशाली दारवटकर, सोनाली जुनवणे, नाज इनामदार, सविता गोसावी, युवासेने चे युवराज पारिख, परेश खांडके, सोहम जाधव, वैभव कदम, चिंतामणी मुंगी, तेजस मर्चंट, अक्षय हबीब, इंद्रजीत शिंदे, आणि शिवसैनिक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: