Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

HomeBreaking Newsपुणे

Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

Ganesh Kumar Mule Jun 23, 2023 2:10 AM

G 20 Summit in Pune | जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन
G 20 Summit in Pune | जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठक | पुणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांची दिली गेली माहिती 
PMC Pune Digital Services | पुणे महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या डिजिटल सेवांनी जी-२० बैठकीसाठी आलेले प्रतिनिधी प्रभावित

Aga Khan Palace | G20 in Pune | जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट

Aga Khan Palace | G20 in Pune  | जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी (G 20 Summit In Pune) आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला (Aga Khan Palace) भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे  पारंपरिक पद्धतीने औक्षण करून  स्वागत करण्यात आले. (Aga Khan Palace | G20 in Pune)
आगाखान पॅलेसमधील (Aga Khan Palace) अनेक दालनांना परदेशी पाहुण्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi), कस्तुरबा गांधी (Kasturba Gandhi) आणि खासगी सचिव महादेव भाई देसाई  (Mahadev Bhai Desai) यांच्याशी निगडित घटना आणि इतिहास जाणून घेतला.  प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतील प्रतिनिधी हे सर्व पाहून भारावून गेले होते. अन्य परदेशी प्रतिनिधींनीदेखील येथे  छायाचित्रे काढून घेऊन  आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न केला.  बहुतेक प्रतिनिधींनी आपल्या जवळील मोबाईलमध्ये  छायाचित्रण कैद करुन घेतले. (Aga khan palace pune)
महात्मा गांधी यांच्या वापरातील अनेक वस्तू आणि अनेक प्रसंगाशी निगडित छायाचित्रे  येथे जतन करुन ठेवण्यात आली आहेत. त्याचाही आनंद परदेशी पाहुण्यांनी घेतला. या स्मारकाशी संबंधित असलेल्या नीलम महाजन यांनी परदेशी प्रतिनिधींना या ऐतिहासिक वास्तूविषयी संपूर्ण माहिती दिली.  (Mahatma Gandhi pune residence)
यावेळी कस्तुरबा गांधी आणि महादेव भाई देसाई यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन परदेशी पाहुण्यांनी अभिवादन केले.
000
News Title | Aga Khan Palace |  G20 in Pune |  G-20 Conference delegates visit the historic Aga Khan Palace in Pune