अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे जाणार मसुरी येथे प्रशिक्षणाला!
| अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची पुन्हा चर्चा सुरु
पुणे | महापालिका अतिरिक्त आयुक्त रविन्द्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binawade) हे 19 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत मसुरी (Mussoorie) येथे प्रशिक्षणासाठी (Training pragram) जाणार आहेत. यामुळे त्यांच्या बदलीची (Transfer) पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. याआधी देखील अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः बदली मागितली होती. मात्र सरकारने कुठला निर्णय घेतला नव्हता. मात्र आता प्रशिक्षण कार्यक्रमाला त्यांचे नाव निश्चित झाले आहे. प्रशिक्षणाला जाणारे अधिकारी नंतर त्याच ठिकाणी माघारी येत नाहीत. असे म्हटले जाते. याचाच आधार घेऊन बिनवडे यांची देखील बदली होईल. अशी चर्चा आता केली जात आहे. (Pune Municipal corporation)
लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी, मसुरी येथे 19 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत Mid-Career training program (phase 3 हा सक्तीचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी राज्यातील 29 IAS अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांचे देखील नाव समाविष्ट आहे. या अधिकाऱ्यांना 16 डिसेंबर लाच कार्यमुक्त करावे, असे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. (Masoorie Training program)
या प्रशिक्षण कार्यक्रमा वरून मात्र अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या बदलीची चर्चा रंगली आहे. प्रशासकीय सूत्रानुसार मसुरी येथे प्रशिक्षणाला गेलेले बरेचसे अधिकारी नंतर त्याच ठिकाणी येत नाहीत. एकतर त्यांना बदली हवी असते किंवा राज्य सरकार कडून त्यांची बदली केली जाते. बऱ्याच वेळेला हे अनुभवण्यास मिळाले आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांची बदली होईल, असे मानले जात आहे. शिवाय अतिरिक्त आयुक्तांनी याआधी सरकारकडे बदलीसाठी मागणी केली होती. मात्र सरकरकडून कुठलेही पाऊल उचलले नव्हते. मात्र आता प्रशिक्षण कार्यक्रम झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांची बदली होईल, असे मानले जात आहे. (Additional Commissioner Ravindra Binawade)