बिबवेवाडी, कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
| बांधकाम विकास विभाग झोन 5 कडून जोरदार कारवाई
पुणे | महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन 5 कडून बिबवेवाडी, कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये 6 हजार चौरस फुट अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. अशी माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
महापालिका प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार पुणे पेठ कोंढवा खुर्द स नं 01 कोंढवा रस्त्यावरील ब्रम्हा अंगण येथील तिसऱ्या मजल्यावरील मुघल सराई या रेस्टोरंट वर कारवाई करण्यात आली. शिवाय कौसर बाग येथील द सेंट्रल मॉल च्या तिसऱ्या मजल्यावरील हॉटेल सिल्व्हर स्पून या रुफटॉप हॉटेल वर कारवाई करण्यात आली. तसेच बिबवेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामावर जोरदार कारवाई करण्यात आली.
या कारवाईत अतिक्रमण विभागातील एक पोलीस दल, एक जेसीबी, दोन गॅस कटर वापरण्यात आले. कारवाईत एकूण 6000 चौरस फूट अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले.
ही कारवाई शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सुधीर कदम, युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता रमेश काकडे, चंद्रसेन नागटिळक, शाखा अभियंता श्रमिक शेवते, उमेश शिद्रुक, कनिष्ठ अभियंता विशाल पाटील यांच्या साहाय्याने करण्यात आली.
