अभय योजनेला 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
: स्थायी समितीची मंजुरी
पुणे : महापालिकेच्या अभय योजनेला आणखी महिना भराची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ 28 फेब्रुवारी पर्यंत असेल. स्थायी समिती सदस्या, नगरसेविका अर्चना तूषार पाटील यांनी यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला उपसूचना देण्यात आली. मंगळवारच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ज्या नागरिकांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नाही, त्यांनाही आता हा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान स्थायी समितीने सरसकट सर्वानाच या योजनेचा लाभ मिळावा असे म्हटले आहे, मात्र यावर आयुक्त काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
: 26 जानेवारी पर्यंत होता कालावधी
पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी पुणे महानगर पालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत अभय योजना लागू करण्यात आली आहे. त्याची मुदत 26 जानेवारीला संपणार आहे. या अभय योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळावा या उद्देशाने या योजनेची मुदत अजून 15 दिवसांनी वाढविण्यात यावी अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी केली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीत देण्यात आला होता. याला उपसूचना देत मुदतवाढ 28 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आली. या मागणीला स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह सर्व स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका आयुक्त यांनी अभय योजना ही निवासी मिळकती पुरती मर्यादित ठेवली होती. समिती सदस्यांनी मात्र सरसकट सर्वांनाच याच लाभ मिळावा अशी मागणी केली. यामध्ये कमर्शिअल चा ही समावेश आहे. मात्र आयुक्त यावर काय निर्णय घेणार. हे महत्वाचे आहे.
या योजनेला मुदत वाढ मिळाल्या मुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. सध्या कोरोना मुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अभय योजने मुळे नागरिकांना दिलासा मिळेल असे नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी सांगितले.
COMMENTS