Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

HomeBreaking Newsपुणे

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

गणेश मुळे Apr 18, 2024 2:38 PM

August Kranti Din | संकल्प सेवा फाऊंडेशन कडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप
International Night Marathon | ४ डिसेंबरला रंगणार यंदाची ३६वी पुणे आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन
Bank Election | श्री लक्ष्मी को-ऑपरेटीव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध 

Abhay Chajed on Anis Sundke | एमआयएम चे अनिस सुंडके यांची उमेदवारी | पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र ! – ॲड अभय छाजेड

 

Abhay Chajed on Anis Sundke – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Pune Loksabha) यांना जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे, एमआयएम चे अनिस सुंडके (Anis Sundke MIM) यांची उमेदवारी जाहीर करण्याचे पडद्यामागील षडयंत्र भारतीय जनता पक्षाने रचले असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड अभय छाजेड (Adv Abhay Chajed) यांनी केला.

 

ॲड अभय छाजेड म्हणाले, अनिस सुंडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट ) यामध्ये होते पुण्यात भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा पराभव होण्याच्या शक्यतेच्या भीतीपोटी भाजपाने अनिस सुंडके यांचा एमआयएम मध्ये प्रवेश घडवून आणला आणि त्यांना एमआयएम तर्फे पुण्यात उमेदवारी मिळेल अशी व्यवस्था केली हे स्पष्ट दिसत आहे. अनिस सुंडके यांनी अनेक वेळा सोयीस्कर भूमिका घेऊन पक्ष बदलले आहेत त्यामुळेच त्यांच्या पक्षनिष्ठेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले असून अशा एमआयएम उमेदवाराला मुस्लीम समाज मतदान करणार नाही. काँग्रेस पक्षाने बहुसंख्यांकां प्रमाणेच अल्पसंख्यांक समाजासाठी देखील मोठे योगदान दिले असून, त्यामुळे अल्पसंख्यांकांची मते देखील काँग्रेस पक्षाला पडतील आणि भाजपाचे एमआयएम चा उमेदवार पुण्यात उभा करण्याचे षडयंत्र अयशस्वी होईल व महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पास्खला रोखण्यासाठी भाजपाने एमआयएमचे अनेक उमेदवार तिथल्या काँग्रेस विरोधी उभे करण्याचे षडयंत्र रचले होते एमआयएम हा पक्ष भाजपचा “B टीम” म्हणून ओळखला जातो. देशामध्ये भाजपाने याच B टीमचा वापर केला आहे, मात्र देशात आणि तेलंगणा मध्ये देखील त्याचा फायदा भाजपाला झाला नाही. तेलंगणा मध्ये एमआयएमचे अनेक उमेदवार उभे करायला लाऊनाही काँग्रेस पक्ष सगळीकडे विजयी झाला व भाजपाचे मनसुबे धुळीस मिळाले, पुण्यातही असेच घडेल अशा विश्वास ॲड अभय छाजेड यांनी व्यक्त केला.