PMC : Health Centre : प्रभाग क्र. १४ क मध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र उभारणार : महिला बाल कल्याण समितीची मान्यता 

HomeपुणेPMC

PMC : Health Centre : प्रभाग क्र. १४ क मध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र उभारणार : महिला बाल कल्याण समितीची मान्यता 

Ganesh Kumar Mule Nov 13, 2021 9:43 AM

Katraj-Kondhwa road : PMC : कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते 
PMC : electricity purchase : सीईएसएल (CESL) संस्थेकडून 3.40/kwh या दराने वीज खरेदी करणार महापालिका 
PMC Garbage Project : पुणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणमंत्री-नगरविकासमंत्री बैठक घेणार

प्रभाग क्र. १४ क मध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र उभारणार

: महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीची मान्यता

पुणे:  प्रभाग क्र. १४ क मतदारसंघात महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र सदय स्थितीत नाही. हे कोरोनाच्या कालात अधिक प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे अशा स्वरूपाच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून महिलासाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणा-या सर्व वैदयकिय चाचण्या एकाच  छताखाली महानगरपालिकेमार्फत करण्यात याव्यात. त्यामुळे प्रभागात अत्याधनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र असावे, अशी मागणी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे यांनी केला होती. याबाबत एक प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यावर प्रशासनाकडून सकारात्मक अभिप्राय आला होता. त्याला समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. अशी माहिती समितीच्या अध्यक्षा रुपाली धाडवे यांनी दिली.

: प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय

प्रस्तावानुसार हे केंद्र उभारण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारीत असणा-या शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरातील फायनल प्लॉट क्र. ५६६ अ (५२०२ आरोग्य कोठी) जागेचा वापर करण्यात यावा. याजागेचा वापर करून त्याठिकाणी बहमजली अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात यावे, याबाबत प्रस्ताव दिला होता. त्यावर महिला व बाल कल्याण समिती सभेने प्रशासनाचा अभिप्राय मागवला होता. त्यावर प्रशासनाने सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
त्यानुसार प्रस्तावित जागा घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यकक्षेत आहे. जागेचे क्षेत्रफळ अंदाजे ५००० चौ. फुट असून सध्या येथे घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाची कोठी कार्यरत आहे. सदरच्या प्रभागामध्ये प्रस्तूत जागेपासून ५ कि.मी.च्या परिसरामध्ये पुणे महानगरपालिकेचे आरोग्य सुविधा केंद्र उपलब्ध नाही. तसेच ५ कि.मी.पेक्षा जास्त परिघामध्ये उपलब्ध असणा-या पणे महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या लॅब तपासण्या उपलब्ध नाहीत.सदर ठिकाणी होणा-या बहुमजली इमारतीचे काम आर्थीक तरतुद उपलब्ध झाल्यास करता येणे शक्य आहे. सदर आरोग्य केंद्रामध्ये प्रयोगशाळा व इतर अनुषंगीक बाबी करीता सर्व आवश्यक यंत्रसामग्री सीएसआर मधुन करता येईल. सदरच्या प्रभागामध्ये गावठाण व झोपडपट्टी असा भाग असल्याकारणाने तेथील गरीब व गरजू रूग्णांना आरोग्य विषयक सेवेचा फायदा होणार आहे. सदर ठिकाणी पुणे महानगरपालिकेमार्फत आरोग्य केंद्र व आरोग्य विषयक विविध सुविधा पुरविताना केवळ बाहयरूग्ण विभाग सेवा पुरविणे शक्य होईल. बाहय रुग्ण सेवेव्यतिरीक्त इतर सुविधा पुरवावयाची झाल्यास पुणे मनपाकडे आवश्यक मनुष्यबळ नसल्याने पीपीपी तत्वावर अथवा आउटसोर्स पध्दतीने इतर सेवा पुरविणे शक्य होईल. या अभिप्रायाला समितीने मान्यता दिली आहे. असे ही धाडवे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0