विद्यार्थ्यांनी वाढीची मानसिकता ठेवावी | डॉक्टर धनश्री घारे
मराठवाडा मित्र मंडळ कनिष्ठ महाविद्यालय शास्त्र विभागात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्राचे व्याख्यान
मराठवाडा मित्र मंडळ कनिष्ठ महाविद्यालयातील शास्त्र विभागात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर धनश्री घारे यांचे “Thrive”(भरभराट होणे) या विषयावरती व्याख्यान झाले.
शास्त्र शाखेतील विद्यार्थी हे त्यांचे दररोजचे तास, प्रयोगशाळा, बारावीची उच्च माध्यमिक परीक्षे तयारी करणे, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जसे की एम एच सी इ टी (MH CET), नीट(NEET), जेईई(JEE)NATA(नाटा) ह्या उपक्रमात व्यस्त असतात.हे सगळं करता करता मुलांची तारेवरची कसरत होत असते. विद्यार्थ्यांची दैनंदिन शैक्षणिक आव्हाने सुलभ करण्याकरता डॉ. धनश्री घारे यांचे “Thrive” या संकल्पनेवर आधारित व्याख्यान आयोजित केले होते.
डॉ. घारे यांनी निश्चित मानसिकता आणि वाढीची मानसिकता ही संकल्पना उदाहरण देऊन स्पष्ट केली. विद्यार्थी हे समज करून घेतात की आपण हुशार, मध्यम किंवा आपल्याला काही येतच नाही .हे गृहीत धरून चालतात परंतु हे काही खरं नाही कारण मेंदूची कार्य करण्याची प्रक्रिया किंवा वाढ ही आयुष्यभर सतत चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी वाढीची मानसिकता ठेवावी हे त्यांनी सांगितले.
सगळ्यांना 24 तास हा सारखाच वेळ दिलेला असतो आपल्या कामाची यादी विद्यार्थ्यांनी जर लिहून ठेवली तर आपला मेंदू रिकामा राहून विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने वेळेचे व्यवस्थापन करता येईल असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी व्यायाम करणे, सूर्यप्रकाश अनुभवणे, हळदीचे सेवन करणे, रिफाइंड साखरेचा कमी वापर करणे याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अर्चना कामठे यांनी केले कनिष्ठ महाविद्यालयीन शास्त्र विभागाच्या समन्वयक प्राध्यापक नेहा कट्टी , प्राचार्य देविदास गोल्हार यांचे मार्गदर्शन लाभले.