Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

HomeपुणेBreaking News

Arvind Shinde | Pune Congress | आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

Ganesh Kumar Mule Aug 09, 2022 8:58 AM

Mahavikas Aghadi Vs BJP | भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली |  महाविका‌स आघाडीचा आरोप
PMC Employees Union | वैद्यकीय योजना मोडीत काढणारा स्थायी समितीचा ठराव रद्द करा  | कामगार मेळाव्यात कामगार संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक भूमिकेत 
Road Dept Tenders | पथ विभागाकडून मागवण्यात आलेल्या निविदा रद्द कराव्यात | कॉंग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे | अरविंद शिंदे

१९४२ ला इंग्रजांविरूध्द काँग्रेसने ‘चले जाव’ ची हाक दिली, मात्र आज भाजपाला ‘चले जाव’ म्हणण्याची गरज आहे. असे प्रतिपादन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. 

 भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज काँग्रेस भवन येथे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते ‘‘ध्वजारोहण’’ करून ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान करण्यात आला.

       यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘१९४२ च्या चले जाव च्या आंदोलनामध्ये मुंबई नंतर देशामधील महत्वाचे ठिकाण असलेले हे पुणे शहर जिथे हुतात्मा नारायण दाभाडे यांना इंग्रजांनी या काँग्रेस भवनच्या आवारामध्ये गोळ्या घातल्या. याच पुणे शहराने देशाला दिशा देणारे विचारवंत नेतृत्व देणारे कतृत्ववान नेते दिले. देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यांदा याच १९४२ च्या आंदोलनामध्ये अरुणा असफ अली यांनी फडकविला. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये कसलाही आणि कोणताही भाग न घेता आज देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटणारे हर घर तिरंगा हे अभियान राबवित आहे परंतु ज्यांनी या तिरंगा झेंड्याला विरोध केला, ज्यांनी झेंडा जाळला आणि ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यानंतर ५१ वर्ष देशाचा तिरंगा झेंडा फडकविला नाही ते आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चमकोगिरी करीत आहेत. १९४२ च्या चले जाव आंदोलनानंतर १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी व क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हुतात्मे झाले. आज मी त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना व क्रांतीकारकांना अभिवादन करतो.’’

       यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रोहिणीताई गवाणकर यांचा सन्मान ज्येष्ठ नेते उल्हास पवार, अरविंद शिंदे, ॲड. अभय छाजेड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना रोहिणीताई गवाणकर म्हणाल्या, ‘‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचे देखील मोठ्या प्रमाणावर योगदान होते. त्यामध्ये प्रामुख्याने अरूणा असफ अली या क्रांतिकारी विचारांच्या होत्या आणि क्रांतीकारी भूमिका त्या निभावत असते. ९ ऑगस्टला गवालिया टँक येथे त्यांनी अत्यंत क्रांतीकारी भूमिका बजावत देशाचा तिरंगा झेंडा फडकवून भूमिगत झाल्या. अशा अनेक महिला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होत्या.’’

       यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्‍यवहारे, दिप्ती चवधरी, धनंजय दाभाडे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, संगीता तिवारी, रजनी त्रिभुवन, द. स. पोळेकर, ॲड. अनिल कांकरिया, भगवान धुमाळ, आबा जगताप, नितीन परतानी, भरत सुराणा, अविनाश गोतारणे, बाळासाहेब प्रताप, हरिदास अडसूळ, ॲड. विजय तिकोने, ॲड. राहुल ढाले, ॲड. संजय साळवे, ॲड. राजेंद्र काळेबेरे, परवेज तांबोळी, आशिष व्‍यवहारे, सचिन भोसले, वाल्मिक जगताप, रमेश सोनकांबळे, सचिन आडेकर, प्रविण करपे, अनुसया गायकवाड, शारदा वीर, ॲड. अश्विनी गवारे, गौरव बोराडे, कान्होजी जेधे आदींसह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.