Chief Fire Officer | मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे 

HomeपुणेBreaking News

Chief Fire Officer | मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे 

Ganesh Kumar Mule Aug 01, 2022 3:55 PM

Abdul Sattar Vs NCP | Pune | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो आंदोलन”
Voter List | PMC Election | प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली | भाजपचा आरोप 
BJP Vs Congress | भेदभावाचे बीज पेरणं, हे केवळ अयोग्यच नव्हे तर अशोभनीय | कॉंग्रेस कडून भाजपला सल्ला 

मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे

पुणे | महापालिका सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील गिलबिले हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार आता आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतेच जारी केले आहेत.

महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अग्निशमन सेवेतील मुख्य अग्रिशमन अधिकारी श्रेणी -१ या पदावर कार्यरत असलेले  सुनिल तानाजी गिलबिले हे दिनांक ३१/०७/२०२२ रोजी कार्यालयीन वेळेनंतर वयोपरत्वे सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यानुषंगाने मुख्य अग्रिशमन अधिकारी, श्रेणी-१ या रिक्त झालेल्या पदाचे अतिरिक्त कामकाज आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिनांक ०१/०८/२०२२ रोजी पासून पुढील आदेश होईपर्यंत करावयाचे आहे.