Mohan Joshi | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी जीएसटी लावू नका – मोहन जोशी

HomeपुणेPolitical

Mohan Joshi | मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी जीएसटी लावू नका – मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Jul 18, 2022 1:31 PM

Sharad Pawar in Congress Bhavan | दोन दशकानंतर शरद पवार काँग्रेस भवनात | काँग्रेसमुक्त भारत होऊच शकत नाही | शरद पवार
Ghanshyam Nimhan | मिळकतकराबाबत आतातरी शहाणे व्हा! | काँग्रेस सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा सरकारला सल्ला
PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?

मोदीजी, किमान जनतेच्या श्वासावर तरी जीएसटी लावू नका – मोहन जोशी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या आनंदात देशातील जनता असताना केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने जनतेच्या रोजच्या गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% जीएसटी लावून भाजपचे मोदी सरकार जनता विरोधी आहे हे पुन्हा सिद्ध केले आहे. गहू,गव्हाचा आटा,तांदूळ,पोहे,मुरमुरे,ज्वारी,बाजरी,गुळ,दही,पनीर अशा असंख्य जीवनावश्यक वस्तूंवर नवा ५% जीएसटी लावत असताना आता किमान जनतेच्या श्वसावर तरी भाजपच्या मोदी सरकारने जीएसटी लावू नये अशी उपरोधिक प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

या संदर्भात मोहन जोशी यांनी सांगितले की केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारला प्रत्येक आघाडीवर अपयश आले असून नोटाबंदी, जीएसटीची घाईने चुकीची अंमलबजवणी याबरोबरच मोठ्या मुठभर उद्योगपतींना धार्जिणे आर्थिक धोरण यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.प्रचंड महागाई व बेकारी जनता भोगत आहे. जनतेच्या श्वासावर जीएसटी लावणे एवढेच आता बाकी राहिले आहे असे मोहन जोशी यांनी म्हंटले.