Potholes in pune | महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी 

HomeपुणेBreaking News

Potholes in pune | महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी 

Ganesh Kumar Mule Jul 11, 2022 4:00 PM

Social Security | Ganesh Mandal pune| सामाजिक सुरक्षेतेच्यादृष्टीने नवीन कल्पना सुचविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गणेश मंडळांना आवाहन
Pune Ganesh Utsav 2024 | पर्यावरणपूरक गणेशोत्सव व गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन 
Teacher Recruitment | PMC | अर्ज करण्यासाठी उद्याची शेवटची मुदत  | महापालिका इंग्रजी शाळेत नेमणार शिक्षक 

महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्ड्यांची डागडुजी

| तर आदर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजवले

पुणे : शहरात गेल्या आठवड्या भरापासून संततधार सुरु आहे. या पावसाने मात्र शहरातील विविध रस्त्यांची चाळण झाली आहे. संततधार पावसामुळे महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामाची पोलखोल होत आहे. एकीकडे शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने अंदाजपत्रकात ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद केली आहे. पण आता खड्डे पडल्यानंतर महापालिकेकडून गेल्या आठवड्याभरात फक्त १०० खड्डे बुजविले आहेत. तर आदर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजवले आहेत. अशी माहिती पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी यांनी दिली.
महापालिकेकडून पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी केली जाते. कोट्यवधी रुपये खर्च करून डांबरीकरण केलेल्या रस्त्यांना पहिल्याच पावसात खड्डे पडण्यास सुरवात झाली आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने पुणेकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाहनांचा वेग मंदावल्याने कोंडीही होत आहे. नागरिकांकडून टीका होत असताना महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे. पण त्याच सोबत महापालिकेच्या या कामात आदर पुनावाला फाउंडेशनकडूनही मदत केली जाते. सीएसआरच्या माध्यमातून त्यांची स्वतःची यंत्रणा वापरून खड्डे बुजविले जातात. गेल्या आठवड्याभरात शहराच्या सर्वच भागात खड्डे पडले आहेत, पण महापालिकेच्या पथ विभागाकडे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा असतानाही संथ गतीने खड्डे बुजविले जात आहेत. पण त्या उलट आदर पुनावाला फाउंडेशनकडे केवळ दोन मशिन आहेत. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून त्यांना यादी दिली जाते, त्यानुसार त्यांच्या खड्डे बुजविण्याचे काम करतात. गेल्या आठवड्याभरात महापालिकेच्या मुख्य खात्याने केवळ १०० खड्डे बुजविले आहेत. तर पुनावाला फाउंडेशनने ४०० खड्डे बुजविले आहेत. असे कुलकर्णी यांनी सांगितले.