राहुल गांधीच्या समर्थनार्थ पुणे कॉंग्रेस कडून निदर्शने
केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेसच्या अध्यक्षा खा. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाब आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचमुळे गेली ३ दिवस काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलावून त्यांच्या अटकेसाठी मार्ग तयार करीत असून या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौक येथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी बोलताना प्र. अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आमचे नेते राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घाबरले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशाचे नेतृत्व राहुलजी गांधी करतील या भीतीमुळेच नॅशनल हेरॉल्ड या चूकीच्या प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुलजी गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’
यावेळी माजी आमदार रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड यांची यावेळी निषेधाची भाषणे झाली.
यावेळी कमल व्यवहारे, अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, संगीता तिवारी, पुजा आनंद, गोपाळ तिवारी, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, नारायण पाटोळे, सुनिल शिंदे, शिवा मंत्री, प्रदिप परदेशी, सतिश पवार, विजय खळदकर, रमेश सोनकांबळे, प्रविण करपे, अजित जाधव, सचिन आडेकर, यासीन शेख, आबा जगताप, नितीन परतानी, साहील केदारी, मेहबुब नदाफ, सुरेश कांबळे, फैय्याज शेख, विश्वास दिघे, गुलाम हुसेन, प्रमोद निनिरिया, मुन्नाभाई शेख, परवेज तांबेळी, संजय अंभग, सेल्वराज ॲन्थोनी, संतोष आरडे आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.