महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना
| रुग्णांसाठी महापालिका दीड कोटींची साधनसामुग्री खरेदी करणार
: स्थायी समितीची मंजूरी
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णांच्या उपचारा प्रित्यर्थ संबंधित रूग्णालयातील रूग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करताना लागणारे इम्लान्ट, औषधे डिस्पोजेबल व इतर आवश्यक साधनसामुग्री महापालिका खरेदी करणार आहे. यासाठी महाटेंडर पोर्टलवर ऑनलाईन निविदा मागविली होती. महापालिकेला यासाठी दिड कोटींचा खर्च येणार आहे. नुकतीच स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णांच्या उपचारा प्रित्यर्थ संबंधित रूग्णालयातील रूग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करताना लागणारे इम्लान्ट, औषधे डिस्पोजेबल व इतर आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणे. (टेंडर क्रमांक ३२ सन २१-२२) कामी महाटेंडर पोर्टलवर ऑनलाईन निविदा मागविली असता आलेल्या ४ टेंडर्सपैकी निविदेतील १ ते १६८ ॲटम्सकरिता लघुत्तम दर सादर करणारे चैतन्य फार्मा यांचेकडून खात्याच्या आवश्यकतेनुसार व मागणीनुसार जीएसटी करासह रक्कम रूपये १,५०,००,०००/- ( अक्षरी रक्कम रूपये एक कोटी पन्नास लाख फक्त ) पर्यंत खर्च करण्यात येईल. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.