Deposits : Insurance Cover : पतसंस्थांमधील ठेवीवर विमा संरक्षण देण्याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार

HomeBreaking Newssocial

Deposits : Insurance Cover : पतसंस्थांमधील ठेवीवर विमा संरक्षण देण्याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार

Ganesh Kumar Mule May 15, 2022 12:14 PM

Mahayuti | Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती
PMC Budget 2024-25 | पुणे महानगरपालिका २०२४-२५ च्या अंदाजपत्रकातील ठळक बाबी जाणून घ्या
Arvind Shinde | भवन रचना विभागाकडील टेंडर प्रक्रिया राजकीय हस्तक्षेपामुळे रद्द करू नये | काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांची आयुक्ताकडे मागणी

पतसंस्थांमधील ठेवीवर विमा संरक्षण देण्याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार

सांगली  : सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत यासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता 5 लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. सहकारी आर्थिक संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे.संस्था चालविणाऱ्या संचालकांनी शासनाचे धोरण व सभासदाचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कोल्हापूररोड सांगली येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था, मर्या सांगली यांच्या नुतन मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील उपस्थित होते.

सहकारी पतसंस्थांसमोर फार मोठी आवाहने आहेत, संपुर्ण सहकार क्षेत्रासमोरच अनेक अडचणी आहेत. तरीसुध्दा या सर्व अडचणींवर मात करुन सहकार पुढील वाटचाल करीत आहे. सहकराचे सक्षमीकरणासाठी शासनही पुढाकार घेत आहे. वेगवेगळ्या उपाया योजना राबवित आहे असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सहकरी संस्थां योग्य चालण्यासाठी संस्थेतील संचालकांचा कार्यभारही तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळे संचालकांची आपल्या सभासदाचे व संस्थेचे हित डोळ्यासमोर ठेवून कारभार करावा. येणाऱ्या काळामध्ये सहकार क्षेत्र अधिक लोकाभिमुख व पारदर्शी करावे त्यामध्ये व्यवसायीकता यावी व आधुनिकीकरणाचा आवलंब करावा यामध्ये डीजिटल माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत शासन नेहमीच सहकारी संस्थांच्या पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेची इमारत ही अत्यंत देखणी उभारण्यात आली असून ती सांगली शहराच्या वैभवात भर घालेल. असे गौरवोद्गार काढून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यामध्ये अनेक कार्यक्रमांसाठी जाणे होते पण एकाद्या पतसंस्थेची अशी इमारत पाहण्यात आली नाही. ही वास्तु अत्यंत सुंदर पध्दतीने तयार करण्यात आली आहे. या पतसंस्थेच्या जवळपास 51 शाखा कार्यरत आहेत. आता आणखीन 10 शाखा सुरु होणार आहेत. या संस्थेतून चालणारा कारभार कर्मवीर आण्णांच्या नावाला शोभेल अशा पध्दतीचे आहे.

सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यावेळी म्हणाले, सहकार क्षेत्रासमोर खुप मोठी आवाहने आहेत या सर्व आवाहनांवर मत करुन कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेने प्रगती साधली आहे. 1987 साली लावलेले रोपटे आज वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. तळागाळातील कष्टकरी जनतेला मदत करत खऱ्या अर्थांने या संस्थेने त्यांना सक्षम केले आहे. ही पतसंस्था सांगलीच्या वैभवात भर घालेल.