महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी विलास कानडे!
पुणे : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी हे पद तयार करण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्तपदी बढती मिळालेले सुरेश जगताप हे राज्यातील पहिले महापालिका अधिकारी होते. राज्य सरकारने नियम तयार केल्यानंतर त्यांना त्या पदावर राहण्याची संधी मिळाली. त्यानंतर हे पद ज्ञानेश्वर मोळक यांच्याकडे सोपवले गेले होते. मोळक निवृत्त झाले आहेत. नियमानुसार या पदावर विलास कानडे यांना संधी मिळणार होती. त्यानुसार कानडे आता अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. राज्य सरकारने नुकतेच या सूचना जारी केल्या आहेत.
– महापालिका अधिकाऱ्यांसाठी पद निर्माण केले
महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. पदोन्नतीने या पदावर महापालिका अधिकाऱ्याला जाता येईल. त्यानुसार सुरेश जगताप हे पहिले महापालिका अधिकारी होते जे अतिरिक्त आयुक्त बनले होते. जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर ही संधी ज्ञानेश्वर मोळक यांना मिळाली. मोळक देखील 30 एप्रिलला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही संधी आता विलास कानडे यांना मिळाली आहे. त्यानुसार कानडे आता अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. सरकारने नुकतेच या सूचना जारी केल्या आहेत.
विलास कानडे यांच्याकडे मिळकतकर विभाग आल्यानंतर त्यात त्यांनी आमूलाग्र सुधारणा केल्या. त्यामुळे टॅक्स विभाग मिळकत वसुलीचे इतिहास रचत चालला आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढतानाच दिसून आले आहे. त्यामुळे महापालिकेला विकासकामे करण्यात मदत मिळते आहे. टॅक्स विभागा अगोदर कानडे यांनी lbt विभागाची देखील जबाबदारी व्यवस्थितपणे सांभाळली होती. महापालिका अधिकाऱ्याच्या हातात हे पद राहिल्याने कर्मचारी वर्गातून आनंद दर्शवण्यात येत होता.
COMMENTS