एका मुंबईकराचा पुणेकरांना टोला
: पुणेकर आणि पीएमपी विषयी मांडली कैफियत
पुणे : एका मुंबईकराने पुणेकरांना ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणत चांगलाच टोला लगावला आहे. पुण्यात पीएमपीच्या बस थांब्यावर नावे नसतात आणि पुणेकरांना विचारायला जावे तर ते आपल्याकडे पर ग्रहातून आलेल्या माणसासारखे पाहतात. बस थांबे काय फक्त जाहिरातीतून उत्पन्न मिळवण्याकरिता केले आहेत काय? असा सवाल ही या मुंबईकराने उपस्थित केला आहे. तसेच बस थांब्यावर प्रवाशांच्यासोयीसाठी सुस्पष्ट अक्षरात बस थांब्यांचे नावे लिहावेत. अशी सूचना महापालिका आयुक्तांना केली आहे.
: वाचा आयुक्तांना लिहिलेले पत्र
“पुणे तिथे काय उणे ” असे पुणेकर स्वाभिमानाने म्हणत असलेतरी पुणे शहरात पीएमटी बसने प्रवास केला असता प्रकर्षाने दिसणारी ‘उणीव ‘ म्हणजे पुणे शहरातील शहर वाहतूक बसथांब्यांवर’बसथांब्यांची नावे नसणे “. बसथांबे हे प्रवाशांच्या सोयीपेक्षा त्यावरील जाहिरातींपासून पुणे महानगरपालिकेला उत्पन्न प्राप्त करण्यासाठीचआहेत की काय अशी अवस्था आहे . मोठमोठाल्या जहिरातीने बसथांबेव्यापून टाकलेले असताना बहुतांश बसथांब्यांवर बस थांब्याचे नाव मात्र दिसून येत नाही . बस थांब्यांचे नाव लिहण्यासाठीच्या केवळ पांढऱ्यापाट्या आहेत .
एकतर पुणेकर मंडळी बसस्टॉप कुठला आहे असे विचारले की हि व्यक्ती कुठल्यातरी परग्रहावरून आल्यासारखे प्रतिसाद देतात. त्यामुळे पुण्यात नव्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागतो .
पुणे महानगर पालिका प्रशासनाला विनंती आहे की , त्यांनी तातडने सर्व बसथांब्यावर थोड्या बस थोड्या अंतरावर असताना बसथाब्याचे नाव दिसेल अशा पद्धतीने आडव्या पाट्या लावून नावे लिहावेत . त्याच बरोबर बस थांब्यांवर मध्यभागी देखील सुस्पष्ट दिसेल अशा पद्धतीनेनावे टाकावीत .
हि सुविधा देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बस मध्येपुढील थांबा कुठला आहे हे दर्शवणाऱ्या ‘डिजिटल बोर्ड्स ‘ सुविधा सुरु करावी .
पुणे महानगरपालिका तातडीने या मेलच्या माध्यमातून समोरआणलेल्या पुण्यातील ‘उणीवेची’ दखल घेत सकारात्मक कृतियुक्त प्रतिसाद देईल या अपेक्षेने पूर्णविराम.
COMMENTS