तुमच्या फायद्याची बातमी : बेरोजगार आहात, नोकरीसाठी भटकता आहात; व्यवसाय करायचाय; तर मग पुणे महापालिकेच्या या प्रकल्पात सामील व्हा!

HomeBreaking Newsपुणे

तुमच्या फायद्याची बातमी : बेरोजगार आहात, नोकरीसाठी भटकता आहात; व्यवसाय करायचाय; तर मग पुणे महापालिकेच्या या प्रकल्पात सामील व्हा!

Ganesh Kumar Mule Apr 09, 2022 1:59 PM

Suspension of election process | महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती
Water for a day | सोमवार पासून पुढील 8 दिवसांसाठी एक दिवसाआड पाणी  | पुणे महापालिकेने जारी केले वेळापत्रक
Property Tax Bills : पुणेकरांनो मिळकत कराची वाढीव बिले भरू नका  : महापालिकेच्या माजी नगरसेवकांचे पुणेकरांना आवाहन 

महापालिकेचा लाईट हाऊस प्रकल्प ठरतोय लाभदायी

पुणे : शहरामध्ये १५ क्षेत्रिय कार्यालय स्तरावर लाईट हाऊस प्रकल्प राबविणे करीता मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत पुणे शहरातील नागरी भागामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील, त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना लाईट हाऊस प्रकल्प अंतर्गत कौशल्य निर्माण करणे करीता प्रशिक्षण देणेत येत आहे. हे लाईट हाऊस प्रकल्प औंध, येरवडा, हडपसर, वारजे-कर्वेनगर, भवानी पेठ, नगररोड-वडगांव शेरी, कोंढवा-येवलेवाडी, कोथरूड, सिहंगडरोड, कसबा-विश्रामबागवाडा इ. क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पुणे सिटी कनेक्ट व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यरत आहेत. त्याचा बेरोजगारांना चांगलाच फायदा होत आहे.
पुणे महानगरपालिका आणि पुणे सिटी कनेक्ट संस्थेमार्फत संयुक्तरित्या लाईट हाऊस प्रकल्प पुणे शहरामध्ये सन २०१६ पासुन कार्यरत आहे. हा प्रकल्प पुणे शहरातील नागरी भागांमधील आर्थिक दुर्बल घटकातील, त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवर्तीना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी कार्यरत आहे. लाईट हाऊस हा प्रकल्प प्रामुख्याने १८ ते ३० वयोगटातील अल्पउत्पन्न व मध्यम वर्गातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या युवक-युवर्तीसाठी राबवण्यात येत आहे. सदर प्रकल्पाकरीता पुणे महानगरपालिके मार्फत पायाभूत सुविधा उदा. इमारत /जागा, फर्निचर, IT साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात येते. पुणे सिटी कनेक्ट संस्था प्रकल्पाची रूपरेषा तयार करणे आणि वेगवेगळ्या सी.एस.आर मार्फत निधी मिळवून प्रकल्प राबवण्याचे काम करते. प्रत्येक लाईट हाऊस मध्ये प्रतिवर्षी साधारणत: ६०० युवकांना प्रवेश दिला जातो. लाईट हाऊस प्रकल्पामध्ये युवकांचा प्रवास हा पुढील ६ टप्प्यांमध्ये होत असतो.
१.समुदायापर्यंत पोहचणे (Community Outreach):
२. फाउंडेशन स्कील्लिंग:
३. समुपदेशन:
8. व्यावसायिक प्रशिक्षण/ कौशल्य:
५. जॉब/नौकरी:
६. माजी विद्याथी

: लाईट हाऊस प्रकल्पाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या यशोगाथा-

• विनायक टिळेकर या युवकाने क्लाउड कॉम्पेटींग चा कोर्स पुर्ण करून मासिक २५०००/- वेतनावर सिस्टीम इंजिनियर या पदावर इम्फोसिस प्रा. लि. या कंपनीमध्ये कार्यरत आहे.
• अविनाश रणदिवे ‘पेटीएम सेल्स अधिकारी’ या पदावर कार्यरत असून त्याला ३.७ लाख वार्षिक वेतन मिळत आहे.
• कार्तिकी मुने या युवतीने सॉफ्टवेअर टेस्टींगचा कोर्स पुर्ण केला असून Accenture कंपनीमध्ये Application Deveplment Associate या पदावर कार्यरत आहे. वार्षिक ३.७५ लाख वेतन मिळत आहे.
• स्नेहल राजपाल यांनी ब्युटी पार्लर हा कोर्स पुर्ण केला असून Urban Clap या कंपनीमध्ये ब्युटीशन पदावर कार्यरत आहे. मासिक र.रू.३०,०००/- वेतन मिळत आहे.
• दिपक सहानी या युवकाने Coding चा कोर्स पुर्ण करून सागा सिटी प्रा. लि. या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. मासिक र.रू.२४,०००/- वेतन मिळत आहे.
• सेबेस्टिअन पावलू डिक्रुझ या युवकाने Full Stack Developer हा कोर्स पुर्ण करून Principal Global Services मध्ये दर महा र.रू. ३७५००/- वेतनावर कार्यरत आहे.
• वैभव पाटील या युवकाने बँकिंग आणि फायनान्स हा स्किलींग कोर्स पुर्ण करून एचडीएफसी बँकेमध्ये वरीष्ठ कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहे.
• पल्लवी सुतार या युवतीने लाईट हाऊसमध्ये फौंडेशन कोर्स पुर्ण करून एसबीआय कॉल सेंटरमध्ये टेलीसेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहेत.
• श्रीमती राणी वांजीरे या युवतीने फायन्यांसियल अकौंटींग व टॅली हे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर विप्रो टेक्नॉलॉजीस लि. या कंपनी मध्ये असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.
• ज्योती गुलुर या युवतीने नर्सिंग कोर्स लाईट हाऊस मधून पुर्ण केला असून आदर्श हॉस्पिटलमध्ये नर्स या पदावर कार्यरत आहे.
• आरती माने या युवतीने फौंडेशन कोर्स पुर्ण केल्यावर तिची एसबीआय कॉल सेंटरमध्ये शाखा संबंध अधिकारी म्हणून निवड झाली.
• सोनु धवारे या लोहियानगर वस्तीमधील युवकाने भवानी पेठ लाईट हाऊसमध्ये प्रशिक्षण घेवून वोडाफोन कंपनीमध्ये टेलिसेल्स एक्झिक्युटीव्ह पदावर कार्यरत आहे.
• जयवंत डाके हा ट्रान्सजेंडर युवक असून त्याने मेकअप आर्टिसट हा स्किलिंग कोर्स पुर्ण करून ब्रायडल
मेकअप चे काम करतो.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0