Property Tax department makes history : मिळकत कर खात्याने इतिहास रचला : 1845 कोटींचे उच्चांकी उत्पन्न

HomeBreaking Newsपुणे

Property Tax department makes history : मिळकत कर खात्याने इतिहास रचला : 1845 कोटींचे उच्चांकी उत्पन्न

Ganesh Kumar Mule Mar 31, 2022 3:37 PM

Ganesh festival | गणेश मंडळासोबत महापालिका व पोलिसांची बैठक होणार या दिवशी  | गणेशत्सवाचे होणार नियोजन
Light House: Ganesh Bidkar : गणेश बिडकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या लाईट हाउसचे उद्घाटन सोमवारी
PMC : Beggars : ऐकावे ते नवलच!  : 115 कुटुंबांनी भीक मागणे सोडले 

मिळकत कर खात्याने इतिहास रचला : 1845 कोटींचे उच्चांकी उत्पन्न

: विभाग प्रमुख विलास कानडे यांची माहिती

पुणे : महापालिकेच्या मिळकतकर खात्याने चालू आर्थिक वर्षात इतिहास रचला आहे. विभागाने वर्षभरात सुमारे 1845 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. आतापर्यंतचे हे उच्चांकी उत्पन्न आहे. मागील वर्षी खात्याने 1664 कोटी उत्पन्न मिळवले होते. खात्याने वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्याने एवढे उत्पन्न मिळाले आहे. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

कानडे पुढे म्हणाले, मिळकत करामधून या आर्थिक वर्षामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न जमा होण्यासाठी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच खात्याचे नियोजन करण्यात आलेले होते. यामध्ये पहिल्या २ महिन्यांमध्ये सवलतीने रक्कम भरण्यासाठी मिळकतधारकांना सुरुवातीपासूनच खात्यामार्फत एस.एम.एस., इमेल इत्यादी पाठविण्यात आले. तसेच खात्याकडील सेवकांमार्फत मिळकतींना प्रत्यक्ष भेटी देणे, संबंधित मिळकतधारक यांना दूरध्वनी करून कर भरणे बाबत आवाहन करणे, अशा विविध प्रकारच्या योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे पहिल्या दोन महिन्यांमध्ये ५,०८, ७१५ इतक्या मिळकतधारकांनी रक्कम रु. ७४५.४१ कोटी इतका मिळकत कर जमा केलेला आहे. त्याचबरोबर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी विहित मुदतीत त्यांचा कर भरणे बाबत वर्तमानपत्राद्वारे. FM रेडीओ वाहिनीद्वारे, फ्लेक्स व बॅनर्सद्वारे आवाहन करण्यात आले होते. दिनांक ०७/०१/२०२२ ते २६/०१/२०२२ व दिनांक ०८/०२/२०२२ ते २८/०२/२०२२ या कालावधीसाठी केवळ निवासी मिळकतधारकांसाठी अभय योजना लागू केलेली असताना, या कालावधीमध्ये देखील पात्र लाभार्थी मिळकतधारकांसाठी एस.एम.एस., दूरध्वनी तसेच या खात्यातील सेवकांमार्फत प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. त्यामुळे ४८,३०४ इतक्या निवासी मिळकतधारकांकडून रक्कम रु.१०८.८३ कोटी इतका मिळकत कर वसूल करण्यात आला.

कानडे यांनी सांगितले कि मिळकत कर जास्तीत जास्त वसूल करण्याबरोबरच आकारणी न झालेल्या मिळकतींची आकारणी करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आल्यामुळे आता पर्यंतच्या एक वर्षातील नव्याने आकारणी होणाऱ्या मिळकतींचा उच्चांकी आकडा आहे. यामध्ये सुमारे ७१,२२० इतक्या नव्याने मिळकतींची नोंद कर आकारणी दफ्तरी (रजिस्टर) करण्यात आलेली आहे व त्यामुळे वार्षिक सरासरी रक्कम रु. २१९.२३ कोटी इतका मिळकत कर कायम स्वरूपी जमा होण्यास मदत होणार आहे.
त्याच बरोबर वापरात बदल झालेल्या मिळकतींची देखील मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येऊन, या आर्थिक वर्षात सुमारे ९८, ६११ इतक्या मिळकतींची बदलाप्रमाणे वाढीव आकारणी केली असून, त्यामुळे वार्षिक रक्कम रु. २०१.०१ कोटी इतक्या कराची मागणी नव्याने कायम स्वरूपी प्राप्त झालेली आहे.
खात्याकडील सेवकांना प्रत्येक महिन्याला त्यांचे कार्यक्षेत्रात असलेल्या मिळकतीची संख्या व थकबाकी या प्रमाणे उद्दिष्ट देण्यात येऊन, ती पूर्तता करण्याच्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका घेऊन उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच विशेषतः दिनांक २०/०१/२०२२ पासून व तत्पूर्वी देखील या वर्षी मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतींकडून सर्व प्रकारचा पाठपुरावा करूनही मिळकत कर न भरल्या मुळे विशेषतः व्यावसायिक वापर असलेल्या मिळकतींची मोठ्या प्रमाणात अटकावणी (attachment) करण्यात आली. या एका आर्थिक वर्षामध्ये सुमारे ७.३०० इतक्या बिगर निवासी मिळकतींची अटकावणी (attachment) करण्यात आली. व्यावसायिक मिळकतीवर करण्यात आलेल्या या कारवाई मुळे मागील तीन महिन्यांमध्ये सुमारे १६, २६९ इतक्या व्यावसायिक मिळकतधारकांनी रक्कम रु. १८५.४० कोटी इतका मिळकत कर जमा केलेला आहे. एका आर्थिक वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात मिळकतींची अटकावणी (attachment) करण्याची ही देखील उच्चांकी आकडेवारी आहे. तसेच खात्याकडे मिळकत करासंदर्भात उदा.नाव दुरुस्ती. ३ पट आकारणी. ४०% सवलत बाबत. क्षेत्रफळदुरुस्ती. इत्यादी लेखी निवेदनाद्वारे व इमेलद्वारे सुमारे २५.३८८ इतक्या प्राप्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने त्यांच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यात आलेले आहे. तसेच पी.एम.सी.पोर्टल वर १०६० पैकी ९९८, आपले सरकार पोर्टल वरील ९४ पैकी ९४, पी.जी.पोर्टल वरील ५१ पैकी ५१ अशा
नागरिकांच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात आली.

: समाविष्ट गावातून 200 कोटींचा टॅक्स

दरम्यान समाविष्ट 11 गावातून महापालिकेला 200 कोटीहून अधिकची रक्कम मिळकत करातून जमा झाली आहे. महापालिका हद्दीत एकूण 34 गांवे समाविष्ट झाली आहेत. त्यापैकी 11 गावांना टॅक्स लागू झाला आहे. तर उर्वरित 23 गावांना पुढील आर्थिक वर्षातून टॅक्स लागू होईल. अशी माहिती विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0