कोथरूडच्या विकासकामांवर आहे लक्ष!
: वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही
: आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
: प्रभाग १० आणि ११ मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन
पुणे : कोथरूडचा विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. तसेच वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १० नवकेतन कॉलनी, धनकुळे चाळ, हमराज चौक, पीएमसी कॉलनी येथे ड्रेनेज लाईन टाकणे आणि प्रभाग क्रमांक ११ मधील सुतारदरा दत्त मंदिर येथे रस्त्याच्या कॉंक्रेटिकरणासाठी चंद्रकांतदादा पाटील यांच्या स्थानिक आमदार विकासनिधीतून निधी उपलब्ध करून दिला असून, या दोन्ही कामांचे भूमिपूजन आज आ. पाटील यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिकांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, नगरसेवक किरण दगडे-पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक, छाया मारणे, अजय मारणे, युवा मोर्चा सरचिटणीस अभिजीत राऊत, विलास मोहोळ, अभिजीत गाडे यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले की, कोथरुडच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. त्यामुळे मतदारसंघातील कोणतीही समस्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू दिला नाही. त्याउलट ज्या कामांना आमदार निधीतून मदत मिळणे शक्य नाही, तेथील प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून देऊन, नागरिकांना त्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे वस्ती भागाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.
ते पुढे म्हणाले की, आमदार निधीतून मंजूर कामे वेळेत पूर्ण करुन देणं ही जशी कंत्राटदाराची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी ही विकासकामे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे, असेही ते यावेळी म्हणाले.
COMMENTS