निवासी मिळकतींना निवासी दरानेच कर आकारणी
पुणे : शहरात अनेक ठिकाणी निवासी मिळकतींना व्यावसायिक दराने कर आकारणी केली जात आहे. यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे निवासी मिळकतीना निवासी दरानेच कर आकारण्यात यावी, असा प्रस्ताव भाजप नगरसेविका अर्चना पाटील यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
: नगरसेविका अर्चना पाटील यांचा प्रस्ताव
पाटील यांच्या प्रस्तावानुसार निवासी जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होत असेल तर व्यावसायिक दराने कर आकारणी करणे योग्य आहे. परंतु त्या जागेचा निवासी वापर होत असेल तर निवासी दरानेच कर आकारणी करण्यात येणार आहे. अभय योजनेत अशा प्रकारे व्यावसायिक दराने कर आकारणी झालेल्या निवासी मिळकतींना सवलत देण्यात यावी. यावर बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार याला मंजुरी देण्यात आली आहे. याचा नागरिकांना फायदा होणार आहे.
COMMENTS