Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

HomeBreaking Newsपुणे

Rahul Bajaj : बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

Ganesh Kumar Mule Feb 12, 2022 12:50 PM

Devendra Fadanvis Vs NCP : फडणवीस यांच्या वयापेक्षाही जास्त काळ पवार साहेब  राजकीय जीवनामध्ये  सक्रिय : पुणे शहर राष्ट्रवादीचे देवेंद्र फडणवीस यांना उत्तर 
Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
Sant Tukaram Maharaj | PM Narendra Modi | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

बजाज समूहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि बजाज समूहाचे दिशादर्शक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पाच दशकांमध्ये बजाज समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला. राहुल बजाज यांचे अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले आहे. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा

राहुल बजाज सन १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर ३० व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली.

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना

राहूल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राहूल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
राहूल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.
राहूल बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.
त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0