मृत्यूपत्राद्वारे मिळालेल्या पतीच्या संपत्तीवर पत्नीचा हक्क किती?
: सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली : पत्नीचा पतीच्या संपत्तीवर किती हक्क असतो, यावर सुप्रीम कोर्टाने एका ५० वर्षे जुन्या खटल्यावर महत्वाचा निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितले की, स्वत: कमाविलेल्या संपत्तीचा मालक जर हिंदू पुरुष असेल आणि जर त्याने मृत्यूपत्राद्वारे ती संपत्ती पत्नीला दिली असेल तर ती त्या संपत्तीचा पूर्ण मालक होत नाही. हे पतीने पत्नीचा मृत्यू पश्चात खर्च भागण्यासाठी योग्य तरतूद केली तर पत्नीचा मृत्यूपत्राद्वारे दिलेल्या संपत्तीवर पूर्ण हक्क राहत नाही, असे म्हटले आहे.
न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एमएम सुंदरेश यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे. हरियाणाच्या जुंडला गावचे रहिवासी असलेले तुलसी राम यांनी १५ एप्रिल १९६८ ला मृत्यूपत्र केले होते. पुढील वर्षी १७ नोव्हेंबर १९६९ ला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपत्रात त्यांनी त्यांची अचल संपत्ती दोन भागात वाटली होती. एक भाग पहिल्या पत्नीचा मुलगा आणि दुसरा भाग दुसऱ्या पत्नीच्या नावे केला होता.
या वाटणीमध्ये देखील दुजाभाव होता. तुलसी राम यांनी मुलाच्या नावे निम्मी संपत्ती पूर्ण मालकी हक्काने दिली होती. परंतू पत्नीला तिचे भरण पोषण होईल एवढी आणि या उद्देशाने सीमित संपत्ती दिली होती. तसेच दुसऱ्या पत्नीच्या मृत्यूनंतर या संपत्तीवर मुलाचा हक्क येईल असेही म्हटले होते. राम देवीने ही संपत्ती विकली होती, यावर मुलाने दावा दाखल केला होता. न्यायालयाने सांगितले की, या कारणामुळे राम देवीकडून संपत्ती विकत घेणाऱ्यांचा या संपत्तीवर कोणताही हक्क उरत नाही. त्यांच्या बाजुने खरेदीखत कायम केले जाऊ शकत नाही. राम देवीला सीमित मृत्यूपत्राद्वारे मिळालेली संपत्ती विकण्याचा हक्क नव्हता, किंवा ती दुसऱ्याच्या नावे हस्तांतर करू शकत नव्हती.
COMMENTS