शहरी गरीब योजनेची 45 कोटींची तरतूद संपली
: 3 कोटींचे वर्गीकरण करण्यास स्थायीची मान्यता
: पुढील कालावधीसाठी निधी आवश्यक
स्थायी समितीने मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार पुणे मनपाचे आरोग्य कार्यालयाअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये राहणारे, दारिद्रय रेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक व वार्षिक उत्पन्न रुपये एक लाखापर्यंत असणारे गोरगरीब अशा नागरीकांच्या वैद्यकीय सेवा सुविधेसाठी शहरी गरीब योजना राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी या योजनांसाठी उपलब्ध करण्यात आलेली तरतूद संपूष्टात येत आहे. शहरी गरीब योजना – योजनेतील सभासद यांचे
आरोग्य सेवा, सुविधेसाठी RE17F-154, ७ क रुग्णालये, प्रसुतीगृह औषधालये, क. सेवकासाठी आरोग्य सहाय
योजना पुणे शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणारे पिवळे रेशनकार्डधारक / वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंतच्या नागरीकांसाठी पुणे मनपातर्फे आरोग्य सहाय्य योजना हे अर्थशिर्षक उपलब्ध करण्यात आलेले आहे. सन २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी या अर्थशिर्षकावर सदर योजनेतील सभासद यांचे आरोग्य सेवा, सुविधेसाठी, शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या खाजगी हॉस्पीटलच्या परताव्यांच्या बिलांच्या प्रतीपूर्तीसाठी रक्कम रुपये ४५,००,००,००० पंचेचाळीस कोटी तरतूद उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर अंदाजपत्रकीय तरतूदीमधून शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या खाजगी हॉस्पीटलच्या परताव्यांच्या बिलांच्या प्रतीपूर्तीसाठी दि.२१/१२/२०२१ अखे. ४४,६३,२२,६६०-८५ खर्च करण्यात आलेला आहे. पुढील कालावधीसाठी अजून 2 कोटी 94 लाखाची आवश्यकता आहे. ही रक्कम वर्गीकृत करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
COMMENTS