PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा   : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा

HomeपुणेPMC

PMC: Road works: congress: रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा : आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा

Ganesh Kumar Mule Jan 18, 2022 4:12 AM

Ramesh Bagwe : राष्ट्रवादीने भाजपच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले  : कॉंग्रेस शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचा आरोप 
Arvind Shinde | MLA Madhuri Misal | MLA Sunil Kamble | आमदार मिसाळ, कांबळे यांचे आंदोलन म्हणजे नौटंकी | अरविंद शिंदे यांचा आरोप
Congress Meeting | Pune | काँग्रेस भवन मध्ये प. महाराष्ट्र विभागातील जिल्हानिहाय आढावा बैठक

  रस्त्याच्या कामाबाबत ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा

: आंदोलन करण्याचा काँग्रेस चा इशारा

पुणे : पुणे शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ते छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता,टिळक रस्ता या रस्त्यांवर ड्रेनेज लाईन,स्मार्ट सिटी अंतर्गत चौक सुशोभीकरण,24×7 पाणीपुरवठा या विभागांची कामे चालू आहेत. मात्र यामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगावा लागत आहे. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार याला जबाबदार आहेत, असा आरोप काँग्रेस ने केला आहे. शिवाय यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस चे सरचिटणीस हृषिकेश बालगुडे यांनी केली आहे.

: नागरिकांना नाहक त्रास

याबाबत बालगुडे यांनी महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार गेले अनेक महिन्यांपासून या विभागांच्या प्रमुखांना अनेक वेळा निवेदन देऊन झाले आहे, ठेकेदार वर्गाला कोणत्याही प्रकारचे कारवाई अथवा त्यांच्याकडून कामे करताना हे अधिकारी दिसत नाही. पुणे महानगरपालिकेने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करताना हे ठेकेदार दिसत नाही. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्षपणे त्यांच्या चुका दाखवून सुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते प्रमुख प्रकल्प ड्रेनेज,पाणीपुरवठा, पथ हे पुणेकरांच्या जीवाशी स्पष्टपणे खेळत आहेत. अनेक रस्त्यांवर झालेला राडारोडा, खड्डे यांचं निवारण कुठेही झाल्याचे दिसून येत नाही. नागरिकांना पुणे शहरातील रस्त्यावरून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरून जावं लागत आहे. याबाबत हि कामे त्वरित पूर्ण न केल्यास तसेच आपण संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न केल्यास आपल्या दालना पुढे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी                                                               आपली राहील. असा इशारा बालगुडे यांनी दिला आहे.