संजीवन वन उद्यानामध्ये मुख्य प्रवेशद्वार व मियावाकी गार्डनचे भूमिपूजन !
पुणे : वारजे येथे ३५ एकर जागेवर पुणे महानगरपालिका व वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांच्या प्रयत्नातून साकारल्या जात असलेल्या संजीवन वनोद्यानातील मियावाकी गार्डनचे व मुख्य प्रवेशद्वारचे भूमिपूजन खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक बाबा धुमाळ, वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर खटके, डॉ. महेश ठाकूर, वनविभागाचे अधिकारी प्रदीप संकपाळ व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
यावेळी वंदना चव्हाण यांनी संजीवन वनोद्याना कशाप्रकारे साकारले जात आहे याची माहिती घेतली. वारजेकरांसाठी हे वनोद्याना पर्वणी असून यामुळे वारजेतील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळणार आहे. वनोद्यानाच्या वेगाने सुरू असलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले व वनोद्याना लवकर पूर्ण होऊन ते नागरिकांना खुले व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
वारजे येथे डुक्कर खिंडीजवळ वन विभागाच्या ३५ एकर जागेमध्ये वन विभाग व पुणे महापालिका यांच्या वतीने साकारण्यात येणाऱ्या या वानोद्यानाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर चार महिन्यात आतापर्यंत अनेक देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. झाडांना पाणी देण्यासाठी टाक्या बसवण्यात आल्या आहेत. वनोद्यानाच्या विकासाचे काम अविरत सुरू असल्याचे दिपाली धुमाळ यांनी सांगितले.
COMMENTS