पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द
: कोरोनाच्या धास्तीने पुढे ढकलला दौरा
पुणे : आगामी महापालिका निवडणुक, पुणे मेट्रो उदघाटन, भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा, महापालिकेच्या इमारतीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण अशा विविध कार्यक्रमांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रमोदी येत्या २८ जानेवारीला पुणे दौऱ्यावर येणार होते. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सूत्रांनी दिली होती. पण महाराष्ट्र आणि पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आगामी महापालिका निवडणुक आणि मेट्रो उदघाटन या कार्यक्रमासाठी डिसेंबरअखेर पुणे दौरा निश्चित झाला होता. पण काही कारणास्तव तो एक महिना पुढे ढकलण्यात आला. पण आता संपूर्ण देशभरात कोरोर्ण रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चे रद्द करण्यात आले आहेत.
देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई पाठोपाठ पुण्यातही रुग्णवाढीचा वेग थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळेच कालपासून संपूर्ण राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक सभांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
COMMENTS