Mulshi News | टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष! मारणेवाडीत पांडुरंगाच्या दिंडीने रंगला भक्तिमय सोहळा

मारणेवाडी येथे काकड आरती सांगतेनिमित्त काढण्यात आलेली पांडुरंगाची दिंडी.

HomeBreaking News

Mulshi News | टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष! मारणेवाडीत पांडुरंगाच्या दिंडीने रंगला भक्तिमय सोहळा

Ganesh Kumar Mule Nov 24, 2026 7:51 PM

PMC Standing Committee | महापालिकेच्या सहा आरोग्य केंद्रांचे होणार रुग्णालयांत रूपांतर; ४९ कोटींचा खर्च
Shaskiy Adhikari Marathi Sahitya Sammelan | पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यात!| पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !
Pune News | सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाच संरक्षण मिळावे | एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाआरती

Mulshi News | टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाचा जयघोष! मारणेवाडीत पांडुरंगाच्या दिंडीने रंगला भक्तिमय सोहळा

 

Maranewadi Religious Festival – The Karbhari News Service – मुळशी तालुक्यातील मारणेवाडी येथे महिनाभर चाललेल्या काकड आरतीच्या सांगता समारोपानिमित्त पांडुरंगाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील महिला, शेतकरी, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. (Maranewadi Kakad Aarti)

मारणेवाडी हे सांप्रदायिक परंपरा जपणारे गाव असून येथे सद्गुरू पांडुरंग बाबा महाराज यांची समाधी, भाऊ महाराज परांडे यांचा आश्रम आणि जगद्गुरू बालूमामा यांचे मंदिर आहे. येथे दर अमावस्या व पौर्णिमेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. तसेच एकनाथषष्ठीचा सप्ताह, दत्तजयंती आणि वार्षिक पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर उत्साहात साजरे केले जातात.

गावातील सर्व नागरिक एकजुटीने आणि पारंपरिक पद्धतीने हे धार्मिक सोहळे पार पाडतात. यंदा गावावर दुष्काळाचे सावट असतानाही ग्रामस्थांनी आपली धार्मिक परंपरा अखंडित ठेवली आहे. पांडुरंग बाबांच्या कृपाशीर्वादाने सर्व धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडतात, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: