Pune PMC Medical College Recruitment Controversy  | वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रकरण तापले! गणेश बिडकरांची आयुक्तांकडे धाव | मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

वैद्यकीय महाविद्यालयातील भरती प्रक्रियेतील आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली.

Homeadministrative

Pune PMC Medical College Recruitment Controversy  | वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रकरण तापले! गणेश बिडकरांची आयुक्तांकडे धाव | मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Nov 23, 2026 7:36 PM

Shivshahir : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
Jagdish Mulik | नगर रस्त्यावर खराडी, विश्रांतवाडी येथे उड्डाणपुल उभारणार
Property Tax : 23 Villeges : समाविष्ट 23 गावांतील मिळकतींना टॅक्स मध्ये 15-27% सवलत!  

Pune PMC Medical College Recruitment Controversy  | वैद्यकीय महाविद्यालय भरती प्रकरण तापले! गणेश बिडकरांची आयुक्तांकडे धाव | मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेणाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

 

Ganesh Bidkar – The Karbhari News Service – भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करावी. त्याचबरोबर, कोणताही ठोस पुरावा नसताना या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव जोडणाऱ्या संबंधितांचीही चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्यासाठी उमेदवारांकडे लाखो रुपयांची मागणी करण्यात आल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले आहे. यामध्ये महाविद्यालयात यापूर्वी कंत्राटी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. प्रवीण तायडे आणि कंत्राटी सहयोगी प्राध्यापक डॉ. अमिता साळे यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतींमध्ये लाच मागितल्याचा आणि पैसे दिल्याचा दावा केला आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे बिडकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, संबंधितांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव घेतल्याचेही समोर आले आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाचा या कथित गैरव्यवहाराशी संबंध दर्शविणारे ठोस पुरावे मांडलेले नाहीत. त्यामुळे पुराव्यांशिवाय मुख्यमंत्री कार्यालयाचे नाव या प्रकरणाशी जोडणे गंभीर असून, वस्तुस्थिती तपासून विनापुरावा आरोप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावी, अशी मागणी बिडकर यांनी केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: