PMC Athletics Track | १० वर्षांखालील मुलांना सणस मैदानावर सराव नाही? गुडघे, स्नायूंना धोका; संघटनांच्या पत्रांनंतर पालिकेचे नवे नियम

PMC Athletics Track | १० वर्षांखालील मुलांना सणस मैदानावर सराव नाही? गुडघे, स्नायूंना धोका, संघटनांच्या पत्रांनंतर नवे नियम

Homeadministrative

PMC Athletics Track | १० वर्षांखालील मुलांना सणस मैदानावर सराव नाही? गुडघे, स्नायूंना धोका; संघटनांच्या पत्रांनंतर पालिकेचे नवे नियम

Ganesh Kumar Mule Nov 07, 2026 8:50 AM

Pune PMC Property Tax | सील केलेल्या 200 व्यावसायिक मिळकतीचा लिलाव करण्याबाबत पुणे महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागाचे नियोजन तयार 
PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा  | महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण 
Pune PMC News | विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला 

PMC Athletics Track | १० वर्षांखालील मुलांना सणस मैदानावर सराव नाही? गुडघे, स्नायूंना धोका; संघटनांच्या पत्रांनंतर पालिकेचे नवे नियम

 

PMC Sanas Ground – The Karbhari News Service –  कै. बाबुराव सणस मैदानावरील सिंथेटिक ट्रॅकवर १० वर्षांखालील मुलांच्या सरावाला पालिका आळा घालणार आहे. लहान वयात कठीण ट्रॅकवर जास्त धावल्याने गुडघे व स्नायूंवर ताण येऊ शकतो, असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळवले आहे. राज्य आणि जिल्हा अॅथलेटिक्स संघटनांनीही सिंथेटिक ट्रॅक लहान मुलांसाठी अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. या पत्रांच्या आधारे क्रीडा विभागाने नवे धोरण तयार केले असून, त्यात वैयक्तिक सराव आणि प्रशिक्षणार्थींसाठी १० वर्षे पूर्ण ही अट घातली आहे. महापालिका प्रशासनाने याबाबत धोरण तयार केले असून ते क्रीडा समितीसमोर ठेवले आहे. यासाठी स्थायी समिती आणि  मुख्य सभेची अंतिम मान्यता आवश्यक असणार आहे. (PMC Sport Department)

वाद कुठून सुरू झाला?

मैदानावर क्षमतेपेक्षा जास्त खेळाडू सराव करत असल्याने ट्रॅक खराब होऊ लागला. यावर प्रशिक्षकांना खेळाडूंची संख्या मर्यादित ठेवण्याच्या आणि लहान मुलांना ट्रॅकवर सरावासाठी वापरू न देण्याच्या सूचना देण्यात आल्या. पत्रात हा वयोगट एका ठिकाणी ३ ते १०, तर दुसऱ्या ठिकाणी ६ ते १० वर्षे असा नमूद आहे. यानंतर उपायुक्त (क्रीडा) यांनी ३० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षक आणि पालकांसोबत बैठक घेतली. त्याचे इतिवृत्त प्रशिक्षकांना देण्यात आले.

प्रशिक्षकांचा आक्षेप

प्रशिक्षकांनी असा मुद्दा मांडला की १० वर्षांखालील मुलांसाठी सध्या ६ वर्षांपासूनच स्पर्धा होतात. त्यावर उपायुक्तांनी भारतीय अॅथलेटिक्स महासंघ (AFI) आणि संबंधित मान्यताप्राप्त संघटनांचे नियम काय आहेत, याबाबत त्यांना पत्र देण्यास सांगितले. क्रीडा विभागाने AFI, पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटना, महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उपसंचालक आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, येरवडा यांना पत्रे दिली.

संघटनांचे उत्तर

महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन :

८ ते १२ वर्षे गटाची राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेतली जाते, पण ती सिंथेटिक ट्रॅकवरच घेणे बंधनकारक नाही. आयोजक जिल्ह्याकडे ट्रॅक नसेल तर ती मातीच्या ट्रॅकवर होते.
१० वर्षे व त्याखालील मुलांसाठी सिंथेटिक ट्रॅकवर सराव केल्याने शारीरिक विकासात मदत होते, अशी कोणतीही नोंद आढळली नाही.
AFI १२ वर्षांखालील खेळाडूंसाठी कोणतीही अॅथलेटिक्स स्पर्धा घेत नाही. वर्ल्ड अॅथलेटिक्सचा किड्स अॅथलेटिक्स कार्यक्रम फक्त जागरूकतेसाठी आहे, त्यात मजेदार खेळ असतात आणि सिंथेटिक ट्रॅक अनिवार्य नाही.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे :

६ ते १० वयात हाडे विकसित होत असतात. ट्रॅक कठीण किंवा जास्त बाऊन्स असल्यास जास्त वेळ धावल्याने गुडघे आणि पायाच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो.
या वयात सतत रनिंग स्पाईक शूज वापरू नयेत. त्यांचा जास्त वापर झाल्यास हॅमस्ट्रिंग स्नायू आणि गुडघ्याच्या स्नायूंवर ताण येऊन दुखापत होऊ शकते आणि कायमस्वरूपी अपंगत्वही येऊ शकते.

पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटना : संघटनेच्या स्पर्धा ६, ८, १०, १२ याच वयोगटांत होतात आणि ६ ते १२ वयासाठी सिंथेटिक ट्रॅकची गरज नसते.

नव्या धोरणात काय?

वैयक्तिक सरावासाठी १० वर्षे पूर्ण व त्यापुढील वयोगटातील खेळाडूच पात्र ठरतील.
प्रशिक्षकाकडे एका सत्रात ३० प्रशिक्षणार्थी (१० वर्षे पूर्ण व पुढील वयोगट) असतील.
वयाचा पुरावा (जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, १०वी/१२वी प्रमाणपत्र) द्यावा लागेल.
सरावात वापरायच्या स्पाईक्सच्या नेल्सची संख्या एका स्पाईकमध्ये ११ पेक्षा जास्त नसावी.
धावणे व उड्यांसाठी स्पाईक नेल्सची उंची ६ ते ९ मिमीपेक्षा जास्त नसावी. उंच उडी आणि भालाफेकीसाठी ९ ते १२ मिमीपेक्षा जास्त नसावी.
खेळाडूंनी स्पोर्ट्स शूज घालूनच ट्रॅकवर प्रवेश करावा, चप्पल किंवा बूट चालणार नाहीत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: