Pune PMC News |  विमानतळाकडे जाणारे रस्ते होणार रुंद; कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणाची आयुक्तांकडून पाहणी

Homeपुणे

Pune PMC News |  विमानतळाकडे जाणारे रस्ते होणार रुंद; कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

Ganesh Kumar Mule Oct 27, 2026 9:27 PM

Pune Airport Road | एअरपोर्ट रस्त्यावरून होणार विना अडथळा प्रवास | सम्राट अशोक चौक, येरवडा पोस्ट कार्यालय येथे सिग्नल कार्यान्वीत
Pune Airport Road | लोहगाव विमानतळ विस्तारासाठी 30 मी. रुंदीचा पर्यायी रस्ता | 14629.76 चौ.मी. जागेचे भूसंपादन करणार
Pune Airport Road | विमानतळ रस्ता होणार वाहतूककोंडी मुक्त; रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच

Pune PMC News |  विमानतळाकडे जाणारे रस्ते होणार रुंद; कामांना गती देण्याचे आयुक्तांचे निर्देश

| सिम्बायोसिस रोडचे ३० मीटर रुंदीकरण, एरो मॉलजवळील भूसंपादन तातडीने पूर्ण करण्याचे आदेश; अतिक्रमणांवर नियमित कारवाई

 

Naval Kishore Ram IAS – The Karbhari News Service –  पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले. विमाननगर, सिम्बायोसिस रोड, नागपूर चाळ ते ५०९ चौक तसेच नॉर्थ मेन रोड परिसरातील विविध कामांची त्यांनी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) प्रत्यक्ष पाहणी केली. (Pune Airport Road)

विमाननगर परिसरातील व्हीव्हीआयपी रोड, सिम्बायोसिस रोड आणि शुभ चौक येथील हातगाड्या, फेरीवाले तसेच साइड मार्जिनमधील अतिक्रमणांची आयुक्तांनी पाहणी केली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी निश्चित ठिकाणे ठरवून नियमितपणे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.

| सिम्बायोसिस रोडचे ३० मीटर रुंदीकरण

रामवाडी भुयारी मार्ग ते पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या सिम्बायोसिस रोडचे मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) ३० मीटर रुंदीकरण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. या कामासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

| नागपूर चाळ ते ५०९ चौक रस्त्याच्या कामाला गती

नागपूर चाळ, जेल रोड पोलीस चौकी ते ५०९ चौक आणि विकफिल्ड चौक मार्गे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. तसेच ५०९ चौकातून हवाई दलाच्या हद्दीतून धानोरी मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गाबाबत चर्चा झाली. या कामाला गती देण्यासाठी एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथील अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

| एरो मॉलजवळील भूसंपादन तातडीने पूर्ण करा

पुणे विमानतळ परिसरातील एरो मॉलजवळ कलम २०५ अंतर्गत नियोजित ३० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले. नॉर्थ मेन रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही पथ विभागाला देण्यात आल्या.

विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन आणि प्रलंबित विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश या पाहणीदरम्यान देण्यात आले.

या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त तुषार बाबर, मुख्य अभियंता (पथ विभाग) राजेश बनकर, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) सोमनाथ बनकर, महापालिका सहाय्यक आयुक्त संजय पोळ तसेच पथ विभाग, बांधकाम विकास विभाग आणि नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: