PMC Safai Kamgar ESIC | सफाई कामगारांच्या हक्कांसाठी सुनील शिंदे आक्रमक | PF-ESIC प्रशिक्षणासह बंद बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्धार

सफाई कामगारांना मार्गदर्शन करताना सुनील शिंदे.

Homeadministrative

PMC Safai Kamgar ESIC | सफाई कामगारांच्या हक्कांसाठी सुनील शिंदे आक्रमक | PF-ESIC प्रशिक्षणासह बंद बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्धार

Ganesh Kumar Mule Sep 30, 2026 8:59 PM

contract workers in the crematorium | स्मशानभूमी मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत महापालिकेत बैठक
Contract workers | PMC pune | कंत्राटी कामगारांची इशारा सभा | राष्ट्रीय मजदूर संघातर्फे आयोजन‌
Labor Law | कामगार कायद्यातील बदलांमुळे किती कामगारांना रोजगार मिळणार ? | कामगार नेते सुनील शिंदे

PMC Safai Kamgar ESIC | सफाई कामगारांच्या हक्कांसाठी सुनील शिंदे आक्रमक | PF-ESIC प्रशिक्षणासह बंद बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्धार

 

Sunil Shinde – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील वारजे आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत सफाई कामगारांसाठी राष्ट्रीय मजूर संघाच्या वतीने पीएफ आणि ईएसआयसीच्या विविध लाभांबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सफाई कामगारांना त्यांच्या हक्कांसह उपलब्ध असलेल्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. (PMC Contract Employees Bonus)

या प्रशिक्षण शिबिरासाठी हॉल मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पीएफ आणि ईएसआयसी विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित कामगारांना संबंधित योजनांची माहिती देत त्याचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील शिंदे यांनी कामगारांनी संघटित होऊन आपले प्रश्न मांडण्याचे आवाहन केले. आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडत असतानाच आपल्या हक्कांसाठीही लढण्यास कामगारांनी सज्ज राहावे, असे त्यांनी सांगितले.

 

कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी सभागृहात आवाज उठवणार

कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांना महापालिका सभागृहात सातत्याने वाचा फोडत असून, यापुढेही त्यासाठी पुढाकार घेत राहणार असल्याचे सुनील शिंदे यांनी सांगितले. तसेच कामगारांचा बंद करण्यात आलेला बोनस पुन्हा सुरू करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पीएफ आणि ईएसआयसीसारख्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणे हे कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, त्याबाबतची योग्य माहिती प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोठ्या संख्येने सफाई कामगारांची उपस्थिती

या प्रशिक्षण शिबिराला वारजे आणि सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कार्यरत सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण आणि सरचिटणीस एस. के. पळसे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. संघटक विशाल बागुल यांनी सूत्रसंचालन केले.

कामगारांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न संघटितपणे मांडण्यासाठी यापुढेही एकत्रितपणे पुढे येण्याचा निर्धार यावेळी उपस्थित कामगारांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: