Pune Ganesh Visarjan | मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेसाठी कारवाई टाळली, आता गुन्हे दाखल करा – विवेक वेलणकर यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

AI Generated Image

HomeBreaking News

Pune Ganesh Visarjan | मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेसाठी कारवाई टाळली, आता गुन्हे दाखल करा – विवेक वेलणकर यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

Ganesh Kumar Mule Sep 26, 2026 6:51 PM

Pune Drug Racket | Shivensena UBT | अमली पदार्थ व गुटख्याच्या विळख्यातून पुण्याला सोडवा | पुणे पोलिस आयुक्तांना शिवसेनेचे (UBT) निवेदन 
PMC : अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा  : महापालिका संघटनाची पोलीस आयुक्तांकडे मागणी 
CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Pune Ganesh Visarjan | मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेसाठी कारवाई टाळली, आता गुन्हे दाखल करा – विवेक वेलणकर यांचे पोलीस आयुक्तांना पत्र

 

Pune News – (The Karbhari News Service) – गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाच्या आदेशांचा भंग करणाऱ्या मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंच आणि निसर्ग सेवक संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी विसर्जन मिरवणुकीबाबत घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन झाल्याच्या अनेक तक्रारी शहरभरातून पोलीस खात्याकडे आल्या आहेत. ध्वनी प्रदूषण आणि फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण यासंदर्भात पोलीस खात्याने, प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि काही स्वयंसेवी संस्थांनी नोंदी घेतल्या आहेत. या सर्व नोंदींच्या आधारे संबंधितांवर आठवड्याभरात गुन्हे दाखल करण्याचे काम पूर्ण करावे, असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर महिनाभरात कोर्टात खटले दाखल करणे आवश्यक आहे. आजवरचा अनुभव असे सांगतो की नंतर राजकीय निर्णय होऊन गुन्हे मागे घेतले जातात आणि याच खात्रीने उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवण्याची हिंमत केली जाते, असे पत्रात नमूद केले आहे.ऐन मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खात्याने जागेवर कारवाई करणे टाळले असेल हे समजू शकतो, मात्र आता याबाबत तातडीने कारवाईची पावले उचलली नाहीत तर दरवर्षी हे प्रकार कमी होण्याऐवजी वाढतच जातील, असा इशारा वेलणकर यांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: