Ganesh Sonune | आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना आता सह महापालिका आयुक्त दर्जा | विधी समितीची मान्यता

Homeadministrative

Ganesh Sonune | आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना आता सह महापालिका आयुक्त दर्जा | विधी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Sep 04, 2026 10:48 AM

Pune PMC Disaster Management | आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पुणे महापालिका तयार करणार SOP | 2 हजार कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण
DCM Ajit Pawar on Pune Rain | पावसामुळे दहावी-बारावीची परीक्षा न देऊ शकलेल्यांची स्वतंत्र परीक्षा घेणार | अजित पवार
PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्तांच्या जबाबदाऱ्या वाढल्या! देण्यात आले अतिरिक्त पदभार

Ganesh Sonune | आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना आता सह महापालिका आयुक्त दर्जा | विधी समितीची मान्यता

 

PMC Law Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत 10 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याच्या धोरणांतर्गत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांना सह महापालिका आयुक्त अर्थात जॉईंट म्युनिसिपल कमिशनर म्हणून संबोधण्याच्या प्रस्तावाला विधी समितीने मान्यता दिली आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा प्रस्ताव विधी समितीसमोर ठेवला होता. (Pune Municipal Corporation – PMC)

महापालिका प्रशासनातील खातेप्रमुख संवर्गातील अनेक अधिकारी 10 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ एकाच पदावर कार्यरत आहेत. त्यांना पदोन्नतीची संधी मिळत नसल्याने त्यांच्या दीर्घ सेवेचा सन्मान व्हावा आणि कामाला प्रेरणा मिळावी यासाठी महापालिकेने सह महापालिका आयुक्त हा पदनाम बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महापालिका अधिकारी शिवाजी दौंडकर, उल्का कळसकर आणि अशोक घोरपडे यांना याचा लाभ देण्यात आला होता. यातील दौंडकर हे आता सेवानिवृत्त झाले आहेत.

प्रस्तावानुसार गणेश श्रीराम सोनुने यांना 18 ऑक्टोबर 2023 पासून हा बदल लागू होणार आहे. सध्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सोनुने यांना मुख्य उद्यान अधीक्षक पदाप्रमाणे सर्व अधिकार सह महापालिका आयुक्त म्हणून मिळणार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हा बदल केवळ संबोधनासाठी आहे. अधिकाऱ्यांचा मूळ हुद्दा आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार असलेले पदनाम बदलणार नाही. मात्र त्यांना सह महापालिका आयुक्त समकक्ष मानून सर्व फायदे देण्यात येणार आहेत. यामध्ये दरमहा 2300 रुपये विशेष वेतनाचाही समावेश आहे.

हा प्रस्ताव नवीन पद निर्मितीचा नसून फक्त नामाभिधान बदल आहे. खातेप्रमुख संवर्गातील इतरही ज्या अधिकाऱ्यांनी सलग 10 वर्षे सेवा पूर्ण केली आहे, त्यांनाही टप्प्याटप्प्याने याचा लाभ मिळणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधी समितीच्या बैठकीत या विषयाला मान्यता देण्यात आली असून आता हा प्रस्ताव मुख्य सभेच्या मंजुरीसाठी जाणार आहे.

—-

सोनुने यांच्याकडे मुख्य अग्निशमन अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार

दरम्यान महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी हे ३१ ऑगस्ट ला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने त्यांना कार्यभारातून मुक्त केले आहे. मात्र विभागाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून याचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य अग्निशमन अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. ——

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: