Sharad Joshi Vicharmanch | दगडूशेठ गणपती मंदिरात शेतकरी संघटनेच्या ३८ व्या विशेषांकाचे प्रकाशन

HomeBreaking News

Sharad Joshi Vicharmanch | दगडूशेठ गणपती मंदिरात शेतकरी संघटनेच्या ३८ व्या विशेषांकाचे प्रकाशन

Ganesh Kumar Mule Sep 03, 2026 7:15 AM

Traffic changes | १ जानेवारी रोजी दगडूशेठ मंदिर परिसरात वाहतूक बदल
Ganesh Jayanti : दगडूशेठ हलवाई गणपती : गणेश जन्म सोहळ्याचे असे असेल नियोजन : Video
Ashok Godse : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांचे निधन

Sharad Joshi Vicharmanch | दगडूशेठ गणपती मंदिरात शेतकरी संघटनेच्या ३८ व्या विशेषांकाचे प्रकाशन

 

Pune News – (The Karbhari News Service) – महाराष्ट्रातील ४० लाख ऊस उत्पादक शेतकरी आणि २५० साखर कारखान्यांवरील हजारो कोटींच्या आयकर वसुलीविरोधातील ऐतिहासिक *’आसूड मोर्चा’* आंदोलनाच्या यशावर आधारित शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या *३८ व्या विशेषांकाचे प्रकाशन* श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिमय वातावरणात झाले. (Vitthal Raje Pawar)

शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाऊंडेशन आणि शेतकरी संघटना महासंघ यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात ट्रस्टचे अध्यक्ष *सुनीलभाऊ रासने* यांच्या हस्ते प्रकाशन झाले. राष्ट्रीय अध्यक्ष *किसान सेवक विठ्ठल राजे पवार* अध्यक्षस्थानी होते.

२०१३ मध्ये साधू वासवानी चौकातील आयकर आयुक्तालयावर काढलेल्या आसूड मोर्चामुळे १ एप्रिल २०१३ रोजी ‘स्टे ऑफ डिमांड’ मिळाला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या विचारातून प्रेरित हे आंदोलन टर्निंग पॉईंट ठरले.

यावेळी पवार म्हणाले, गणरायाच्या चरणी हा विशेषांक अर्पण करत असून, पुढील काळात संघर्षाचे १३-१४ दस्तऐवजीकरण प्रकाशित केले जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, हमीभाव (MSP) मिळावा, यासाठी कायदेशीर लढा अधिक तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. प्रकाश पाटील, डॉ. राजू चौधरी, मल्लेश कांबळे, अनिल भांडवलकर, सदानंद शिंदे आदी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: