Pune PMP | पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी PMPML चा मोठा निर्णय!

Homeadministrative

Pune PMP | पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी PMPML चा मोठा निर्णय!

Ganesh Kumar Mule Aug 24, 2026 7:46 PM

Funeral | अंत्यसंस्कार दरम्यान होतेय पैशासाठी अडवणूक! टेंडरचा उपयोगच काय ?
‘UPSC’ Exam Coaching | ‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन | प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून
Anant Chaturdashi 2022 | पुणे उपनगरात गणेश मंडळांना रात्री १२ पर्यंत परवानगी

Pune PMP | पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी PMPML चा मोठा निर्णय!

 | दैनिक पासवर 50 टक्के सवलत

 

PMPML – (The Karbhari News Service) –  पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी दैनिक पास दरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 24 ऑगस्ट 2026 पासून करण्यात येणार असल्याचे  स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune News)

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांनी हा आदेश जारी केला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 60 वर्षे व वरील ज्येष्ठ नागरिकांकरीता पास दरात 50 टक्के सवलत लागू करणे विषयी मागणी करण्यात आली होती.

त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. च्या मा. संचालक मंडळाच्या  बैठकीमध्ये सदरची योजना PMPML च्या कार्यक्षेत्रातील हद्दीतील 60 वर्षांच्या व वरील नागरिकांना 50 टक्के पास सवलत लागू करणे व सदर ठरावाची अंमलबजावणी करणे या  ठरावास मान्यता देण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिक दैनिक पास दरामध्ये होणारा बदल खालीलप्रमाणे –

सध्या ज्येष्ठ नागरिक दैनिक पास संचलन हद्दीपर्यंत सर्व मार्गासाठी पुणे व पिंपरी चिंचवड मनपा धोरणानुसार सवलतीचा पास याचा मूळ दर 70 रुपये आहे. आता नव्या निर्णयानुसार प्रवाशांकडून केवळ 35 रुपये वसूल केले जाणार आहेत. उर्वरित 35 रुपये दोन्ही मनपा कडून अनुदान म्हणून महामंडळाला प्राप्त होणार आहे.

या निर्णयामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे. दैनंदिन प्रवासासाठी PMPML वर अवलंबून असलेल्या ज्येष्ठांना यामुळे आर्थिक बचत होणार आहे.

तसेच या सवलतीप्रमाणे ई तिकीट प्रणालीमध्ये आवश्यक तो बदल करण्यास मान्यता देण्यात आली असून, सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: