PMC on Coaching Classes | शहरातील खासगी क्लासेसचे पुणे महापालिका करणार फायर ऑडिट!

Homeadministrative

PMC on Coaching Classes | शहरातील खासगी क्लासेसचे पुणे महापालिका करणार फायर ऑडिट!

Ganesh Kumar Mule Aug 24, 2026 7:46 AM

PMC – Pune Metro | स्वारगेट-कात्रज मेट्रोसाठी कात्रज चौकातील महापालिकेची जागा मेट्रोला मालकी हक्काने दिली जाणार
Dr Babasaheb Ambedkar Bhavan Expansion | डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या विस्तारीकरणासाठी महापालिका प्रशासन आग्रही | भूखंडाचा वाणिज्य झोन PSP करण्यासाठी राज्य सरकार कडे करणार पाठपुरावा 
PMC JE RR | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या सेवा नियमात बदल करण्याची मागणी 

PMC on Coaching Classes | शहरातील खासगी क्लासेसचे पुणे महापालिका करणार फायर ऑडिट!

| शहर सुधारणा समितीत ऐनवेळी दाखल केलेला प्रस्ताव मंजूर, मुख्य सभेकडे प्रस्ताव जाणार

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – विद्यार्थ्यांचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेसचे महापालिकेमार्फत फायर ऑडिट करण्यात यावे, तसेच खासगी क्लासेससाठी कडक अग्निरोधक आणि सुरक्षिततेची नियमावली तयार करून तिची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, असा प्रस्ताव शहर सुधारणा समितीत ऐनवेळी दाखल करण्यात आला होता. हा प्रस्ताव समितीने मंजूर केला असून आता तो अंतिम निर्णयासाठी मुख्य सभेकडे पाठवण्यात येणार आहे. (PMC City Improvement Committee)

हा प्रस्ताव नगरसेवक अजित घुले यांनी सुचक म्हणून तर राकेश कामठे यांनी अनुमोदक म्हणून मांडला होता.

पुणे हे देशातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. येथे शिक्षणासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो विद्यार्थी येतात. इतर शहरांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची संख्या येथे सर्वाधिक आहे. त्यामुळे शहरात शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक खासगी कोचिंग क्लासेसचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. अनेक क्लासेस आणि शैक्षणिक ठिकाणी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. परंतु त्या तुलनेत अग्निशामक सुरक्षेच्या नियमांचे पालन होते का, याबाबत साशंकता आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे घडलेली भीषण जळीत दुर्घटना अत्यंत क्लेशदायक होती. अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती पुणे शहरात होऊ नये, यासाठी महानगरपालिकेच्या मार्फत शाळा, महाविद्यालये यांचे फायर ऑडिट महानगरपालिकेमार्फत करण्यात यावे व त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्यात यावा तसेच खासगी कोचिंग क्लासेसची तपासणी करून अग्निरोधक व सुरक्षिततेची कडक नियमावली तयार करून शहरात कठोर अंमलबजावणी करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने आपण वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे, असे प्रस्तावात म्हटले आहे.

शहर सुधारणा समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या समितीचा ठराव म्हणून हा प्रस्ताव आता मुख्य सभेपुढे ठेवला जाणार आहे. मुख्य सभेने मंजुरी दिल्यानंतर महापालिका आयुक्तांना याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले जातील.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: