Suhas Tingre NCP | पुण्यातील मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय सुविधा उभारणार

Homeadministrative

Suhas Tingre NCP | पुण्यातील मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय सुविधा उभारणार

Ganesh Kumar Mule Aug 16, 2026 11:48 AM

PMC Property Tax Abhay Yojana | दोन महिन्याच्या अभय योजनेतून महापालिकेला ७७३ कोटींचा महसूल | आर्थिक वर्षात मिळाले २५५८ कोटी 
Property Tax | 40% कर सवलत | उपमुख्यमंत्र्यांचा पुढाकार; मुख्यमंत्री मात्र सही करेनात!
Plastic Bottles | प्लास्टिक बॉटल संकलन स्पर्धा | 7 टन 68 किलो प्लास्टिक बॉटल जमा | सरासरी प्रति व्यक्ती 5.02 किलो बॉटल संकलन

Suhas Tingre NCP | पुण्यातील मोकाट जनावरांसाठी आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय सुविधा उभारणार!

स्थायी समितीची मंजुरी, 34 नव्या गावांसह शहरभर होणार अंमलबजावणी

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांसह संपूर्ण शहरातील भटक्या आणि मोकाट जनावरांच्या संरक्षणासाठी आता आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या संदर्भातील ठरावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी हा ठराव स्थायी समिती बैठकीत सादर केला होता. प्रस्तावावर संबंधित विभागाकडून सकारात्मक अभिप्राय आल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी मिळाली.

कोणत्या सुविधा उभारल्या जाणार?
मंजूर झालेल्या प्रस्तावानुसार पुणे शहरात पुढील सुविधा उभारण्यात येणार आहेत.
1. आधुनिक गोशाळा
2. पशुवैद्यकीय रुग्णालय आणि लसीकरण केंद्र
3. चारा बँक आणि चारा व्यवस्थापन केंद्र
4. मोकाट जनावरांचे पुनर्वसन आणि संगोपन केंद्र

या सर्व सुविधांसाठी आवश्यक कार्यवाही आता प्रशासनामार्फत सुरू करण्यात येणार आहे.

पुणे शहराची लोकसंख्या आणि वाहतूक सातत्याने वाढत आहे. त्यामुळे मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि जनावरांच्या आरोग्याशी संबंधित समस्या गंभीर बनल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करून जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्हीचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठरावास मान्यता मिळाल्यानंतर सुहास टिंगरे म्हणाले की, मोकाट जनावरांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. स्थायी समितीने या प्रस्तावाला दिलेली मान्यता हा त्यादृष्टीने महत्त्वाचा निर्णय आहे. आता प्रशासनाने याची प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या सुविधांमुळे मोकाट जनावरांना योग्य निवारा, उपचार आणि चारा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: