Sus Nande Road | सुस-नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्डजवळील रस्ता रुंदीकरणाचे काम निविदा प्रक्रियेची वाट न पाहता तातडीने केले जाणार

Homeadministrative

Sus Nande Road | सुस-नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्डजवळील रस्ता रुंदीकरणाचे काम निविदा प्रक्रियेची वाट न पाहता तातडीने केले जाणार

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 3:39 PM

PMPML Deficit | पीएमपीच्या तुटीत सातत्याने वाढ | महापालिकेवर दरवर्षी मोठा आर्थिक बोजा
PMC Standing Committee | अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे स्थायी समितीची बैठक तहकूब | समिती अध्यक्ष आणि सदस्यांनी दर्शवली नाराजी
Pune Ganeshotsav 2026 | गणेशमूर्ती पुनर्विसर्जनासाठी खाण भाड्याने | १५ लाखांवरून दर थेट साडेबारा लाखांवर

Sus Nande Road | सुस-नांदे रस्त्यावरील सनीज वर्ल्डजवळील रस्ता रुंदीकरणाचे काम निविदा प्रक्रियेची वाट न पाहता तातडीने केले जाणार

| स्थायी समितीची मंजुरी, वन विभागाची जागा ताब्यात घेऊन अडथळे दूर करण्याचे आदेश

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – सुस ते नांदे या महत्वाच्या जोडरस्त्यावरील सनीज वर्ल्ड येथील खिंड फोडून रस्ता रुंदीकरणाचे अनेक महिन्यांपासून रखडलेले काम आता तातडीने हाती घेतले जाणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने  या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. रस्ता रुंदीकरणाचे उर्वरित काम निविदा प्रक्रियेची वाट न पाहता “तातडीचे काम” म्हणून त्वरित हाती घेतले जाणार आहे.  (Pune PMC News)

हा प्रस्ताव नगरसेविका मयुरी राहुल कोकाटे यांनी मांडला होता.

सुस-नांदे रस्ता रुंदीकरणाचे काम PMC मार्फत सुरू करण्यात आले होते. मात्र नांदे गावातील वन विभागाची जागा ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेमुळे हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत बंद आहे.

या खिंडीतून दररोज हजारो नागरिक, शालेय मुले, नोकरदार आणि अवजड वाहने ये-जा करतात. रस्ता अर्धवट असल्यामुळे पावसाळ्यात चिखल, खड्डे यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बाबत माजी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनीही प्रशासनाला लेखी आदेश दिले होते.

स्थायी समितीने नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी खालील निर्णय घेतले आहेत:

1. *काम तातडीने सुरू करा*: सुस-नांदे रस्ता, सनीज वर्ल्ड येथील खिंड फोडून रस्ता रुंदीकरणाचे उर्वरित काम निविदा प्रक्रियेची वाट न पाहता “तातडीचे काम” म्हणून त्वरित हाती घ्यावे.
2. *वन विभागाची जागा ताब्यात घ्या*: वन विभागाची जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्या जागेचा ताबा तातडीने घ्यावा.
3. *निधी उपलब्ध करा*: सदर कामासाठी लागणारा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुधारित अंदाजपत्रक आणि प्रस्ताव तयार करून तो स्थायी समितीकडे मान्यतेसाठी सादर करावा.
4. *कृती आराखडा सादर करा*: सदर कामाची सद्यस्थिती आणि पुढील 30 दिवसांच्या कृती आराखड्याचा अहवाल पुढील स्थायी समिती सभेत सादर करावा.

या निर्णयामुळे बाणेर, बालेवाडी, सुस, नांदे आणि परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रुंद रस्ता झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: