PMC Sport Officer | पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदाच्या आकृतीबंधात केली जाणार सुधारणा!

Homeadministrative

PMC Sport Officer | पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदाच्या आकृतीबंधात केली जाणार सुधारणा!

Ganesh Kumar Mule Aug 11, 2026 8:10 AM

Supriya Sule | यशस्विनी सन्मान पुरस्कारासाठी आता १२ मे पर्यंत अर्ज करता येतील | खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती
PMC Isolated Post Recruitment| पुणे महापालिकेत प्रोटोकॉल ऑफिसर, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीसह १३ एकाकी पदांची भरती | मुख्य सभेची मान्यता
Question Hour in PMC GB | चालू पंचवार्षिक मध्ये तरी प्रश्नोत्तराचा तास होणार का? | माजी महापौर संघटनेचा महापौरांना सवाल 

PMC Sport Officer | पुणे महापालिका क्रीडा अधिकारी पदाच्या आकृतीबंधात केली जाणार सुधारणा!

| पदोन्नती साठी पात्र असणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना मिळणार न्याय

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी वर्ग-2 या पदावर सरकार कडून थेट नियुक्ती झाल्याने सहायक क्रीडा अधिकारी सोनाली कदम यांच्या पदोन्नतीत अडथळा निर्माण झाला होता. हा अडथळा दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने क्रीडा अधिकारी पदाच्या आकृतीबंधात 1 जागा वाढवण्याचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत चा प्रस्ताव विधी समिती समोर ठेवण्यात आला आहे. मुख्य सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. (PMC Law Committee)

महापालिका प्रशासनाकडे सहायक क्रीडा अधिकारी वर्ग-3 सोनाली कदम यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात म्हटले होते की, शिवराज काळूराम राक्षे आणि रेश्मा शिवाजी पुणेकर यांची क्रीडा अधिकारी वर्ग-2 या पदावर थेट नियुक्ती झाल्याने त्यांच्या भविष्यातील पदोन्नतीवर अन्याय होणार आहे.

सध्या महापालिकेत क्रीडा अधिकारी वर्ग-2 ची 2 पदे मंजूर आहेत. सेवा प्रवेश नियम 2014 नुसार यापैकी 50 टक्के म्हणजे 1 पद नामनिर्देशनाने आणि 1 पदोन्नतीने भरले जाते. मात्र दोन्ही पदांवर थेट सरकार कडून नियुक्ती झाल्याने सहायक क्रीडा अधिकारी पदावर 3 वर्षे पूर्ण करणाऱ्या सोनाली कदम यांना पुढे पदोन्नतीची संधी मिळणार नव्हती.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आकृतीबंधात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार क्रीडा अधिकारी पदोन्नतीसाठी 1 जागा वाढवण्यात यावी. यामुळे भविष्यात पात्र सहायक क्रीडा अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.

आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 51 (3) (4) व कलम 45 (3) (अ) नुसार शासनाची मान्यता मिळवण्यासाठी हा सुधारित प्रस्ताव विधी समिती आणि मुख्य सभेच्या मान्यतेसाठी पाठवावा.

सुधारित नियमांनुसार क्रीडा अधिकारी पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी, B.P.Ed पदवी, SAI चे प्रमाणपत्र, राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य आणि शासकीय, निमशासकीय क्रीडा क्षेत्रातील 2 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. पदोन्नतीसाठी सहायक क्रीडा अधिकारी पदावर किमान 3 वर्षे सेवा पूर्ण असणे बंधनकारक आहे.

कदम यांच्या तक्रारीमुळे प्रशासनाने आकृतीबंधात सुधारणा करण्याचे पाऊल उचलल्याने महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये याचे स्वागत होत आहे.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: