Pramod Nana Bhangire | शनिवार पेठेत सिलेंडर गेला खड्ड्यात |  प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेला सवाल

Homeadministrative

Pramod Nana Bhangire | शनिवार पेठेत सिलेंडर गेला खड्ड्यात |  प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेला सवाल

Ganesh Kumar Mule Aug 10, 2026 9:06 PM

Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले
Mahavikas Aghadi | भाजपामधील आयारामांना इंडिया आघाडीने उमेदवारी देऊ नये | सामाजिक कार्यकर्त्याचा इशारा
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका|  महागाई भत्त्याबाबत मोठी बातमी | जाणून घ्या काय आहे प्रकरण

Pramod Nana Bhangire | शनिवार पेठेत सिलेंडर गेला खड्ड्यात |  प्रमोद नाना भानगिरे यांचा महापालिकेला सवाल

| “लाखो-कोट्यवधी खर्च करून रस्त्यांची ही अवस्था? पुणेकरांच्या पैशांचा चुराडा कधी थांबणार”

 

Pune Road – (The Karbhari News Service)–  पुणे महापालिका नेमकं करते तरी काय? असा थेट सवाल शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी X वर पोस्ट करून महापालिका प्रशासनाला केला आहे. शनिवार पेठेतील रस्त्यावर सिलेंडर ठेवताच रस्त्याचा भाग खचून मोठा खड्डा पडल्याची घटना त्यांनी मांडली आहे. (Pune Potholes)

भानगिरे यांनी 10 ऑगस्ट रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुण्यातील शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळाजवळील रस्त्यावर सिलेंडर ठेवताच रस्त्याचा भाग अक्षरश: खचला. भला मोठा खड्डा पडला आणि सिलेंडर थेट त्यात गेला.

रस्त्याची ही अवस्था पाहता पुणे महापालिकेच्या कामाचा दर्जा आणि ठेकेदारांच्या कामावर प्रशासनाचा असलेला अंकुश याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह आहे, असे भानगिरे म्हणाले.

 

पुणेकरांच्या पैशांचा चुराडा?
“लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते तयार केल्याचा दावा केला जात असताना प्रत्यक्षात रस्त्याची एवढी दयनीय अवस्था असेल, तर या निकृष्ट कामाची जबाबदारी कोणाची? नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यानंतरच महापालिका प्रशासन जागे होणार का? विकासाच्या नावाखाली पुणेकरांच्या पैशांचा असा चुराडा कधी थांबणार?” असे प्रश्न त्यांनी पोस्टमध्ये उपस्थित केले.

भानगिरे यांनी @PMCPune @PMCCare @pmccarepune यांना टॅग करत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असताना, शिवसेनेच्या शहर प्रमुखांनीच सोशल मीडियावरून प्रशासनाला धारेवर धरल्याने पुन्हा एकदा मनपाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: