Pune PMC News | ट्युलिप मधील कनिष्ठ अभियंत्यांचा 4 महिन्यांपासून प्रलंबित वेतनाचा मार्ग मोकळा!

Homeadministrative

Pune PMC News | ट्युलिप मधील कनिष्ठ अभियंत्यांचा 4 महिन्यांपासून प्रलंबित वेतनाचा मार्ग मोकळा!

Ganesh Kumar Mule Aug 07, 2026 7:15 PM

Aba Bagul | परकीय शक्तींची घुसखोरी ‘सिटीझन कार्ड’द्वारे रोखणे सहजशक्य : आबा बागुल
New Wage Code | नवीन कामगार संहिता, वेतन डीकोड केलेले – मसुदा तयार | कधीही लागू होऊ शकतो | संपूर्ण अहवाल वाचा
Pune PMC News | समाज विकास विभागाच्या योजनांसाठी उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला मान्यता

Pune PMC News | ट्युलिप मधील कनिष्ठ अभियंत्यांचा 4 महिन्यांपासून प्रलंबित वेतनाचा मार्ग मोकळा!

स्थायी समितीने 25 लाख रुपयांच्या निधीला दिली मान्यता

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या TULIP अर्थात The Urban Learning Internship Program अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या 12 कनिष्ठ अभियंत्यांचा गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित असलेला वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने २५ लाख रकमेच्या वर्गीकरणाला मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या TULIP कार्यक्रमाअंतर्गत पुणे महापालिकेने 12 महिन्यांसाठी 187 उमेदवारांची निवड केली होती. त्यापैकी 8 यांत्रिकी आणि 4 स्थापत्य असे एकूण 12 कनिष्ठ अभियंते घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे देण्यात आले आहेत.

या उमेदवारांचा कार्यकाल 01/04/2026 ते 31/03/2027 असा आहे. प्रति उमेदवारास दरमहा 15,000 रुपये प्रमाणे वर्षाला 1,80,000 रुपये आणि 12 उमेदवारांसाठी वार्षिक 21,60,000 रुपये इतके वेतन देणे अपेक्षित आहे.

मात्र घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे यासाठी स्वतंत्र बजेट उपलब्ध नसल्याने गेल्या चार महिन्यांपासून त्यांचे मानधन रखडले होते. हा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने गणपती उत्सवासाठी उपलब्ध असलेल्या 1.75 कोटी रुपयांच्या निधीपैकी शिल्लक राहिलेल्या 0.25 कोटी रुपये म्हणजेच 25 लाख रुपये या नवीन बजेट हेडवर वर्ग करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता.

काल झालेल्या बैठकीत स्थायी समितीने “घनकचरा व्यवस्थापन व नगर विकास योजना 12 महिने करिता कनिष्ठ अभियंता यांची हंगामी नेमणूक करणे” या नवीन बजेट हेडसाठी 25 लाख रुपयांच्या तरतुदीला मान्यता दिली.

त्यामुळे आता ट्युलिपमधील कनिष्ठ अभियंत्यांना त्यांचे प्रलंबित वेतन लवकरच मिळणार आहे.

ट्युलिप कार्यक्रमाचा उद्देश शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे हा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: