Pramod Nana Bhangire | उरुळी देवाची भूसंपादन प्रकरण: न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेनेचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल

Homeadministrative

Pramod Nana Bhangire | उरुळी देवाची भूसंपादन प्रकरण: न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेनेचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल

Ganesh Kumar Mule Aug 04, 2026 1:25 PM

Arogyavardhini Center | आरोग्यवर्धिनी केंद्रात 1406 समुदाय आरोग्य अधिकारी यांची रिक्त पदे भरणार – डॉ. तानाजी सावंत, आरोग्य मंत्री
Code Of Conduct | आदर्श आचारसंहिता पाळण्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांचे एकमत
PMC Election 2022 | महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत उद्या  | बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी 11 वाजता होणार सोडत कार्यक्रम 

Pramod Nana Bhangire | उरुळी देवाची भूसंपादन प्रकरण: न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेनेचा पुणे महापालिकेवर हल्लाबोल

हजारो कोटींची उलाढाल असणारी पुणे महानगरपालिका 12 कोटी देऊ शकत नाही का – प्रमोद नाना भानगिरे

 

Pune Shivsena – (The Karbhari News Service) – उरुळी देवाची येथे कचरा डेपोसाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात शेतकऱ्यांना मोबदला न दिल्याने न्यायालयाने पुणे महानगरपालिका आयुक्तांची खुर्ची आणि लॅपटॉप जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनावर सडकून टीका केली आहे. (PMC Pune Commissioner)

प्रमोद नाना भानगिरे म्हणाले, हजारो कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या पुणे महानगरपालिकेला शेतकऱ्यांचा 12 कोटी रुपयांचा प्रलंबित मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत का. उरुळी देवाची येथे कचरा डेपोसाठी जमीन संपादित करताना शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला वेळेवर न दिल्यामुळेच आज ही वेळ आली आहे. न्यायालयाला आयुक्तांची खुर्ची आणि लॅपटॉप जप्त करावा लागत आहे. यापेक्षा मोठी लाजिरवाणी बाब महापालिकेसाठी कोणती असू शकते.

ते पुढे म्हणाले, गप्पा मारणाऱ्या आणि मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांचा मोबदला लवकरात लवकर अदा करावा. न्यायालयाने आधीच खुर्ची आणि लॅपटॉप जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे दुसऱ्यांदा जप्तीची वेळ महापालिकेवर येण्यापूर्वीच प्रशासनाने जागे व्हावे.

भूसंपादन विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि नियोजनशून्य कारभारामुळे पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे, असा आरोपही भानगिरे यांनी केला. लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य न दिल्यास प्रशासनाला अशाच प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी सांगितले.

उरुळी देवाची येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. मात्र मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने कठोर भूमिका घेत आयुक्तांविरोधात जप्तीचे आदेश दिले होते.

शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला तातडीने देऊन महापालिकेने आपली प्रतिष्ठा वाचवावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: