Pune Grand Tour | पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी ११४.८९ कोटींच्या वर्गीकरणाला मंजूरी

Homeadministrative

Pune Grand Tour | पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी ११४.८९ कोटींच्या वर्गीकरणाला मंजूरी

Ganesh Kumar Mule Jul 30, 2026 9:28 PM

Deepak Mankar | Ajit Pawar | Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar
PMC Pension | पेन्शन प्रकरणे प्रलंबित ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस नंतर आता अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून शास्तीची कारवाई
Shivsnea UBT on PMC Election | शिवसेना (UBT) कडून ७१ उमेदवार मैदानात! 

Pune Grand Tour | पुणे ग्रँड चॅलेंज टूरसाठी ११४.८९ कोटींच्या वर्गीकरणाला मंजूरी

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Shrinath Bhimale PMC – (The Karbhari News Service) – पुण्यात २०२७ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२७’ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि विद्युत विषयक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ११४ कोटी ८९ लाख ७३ हजार रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव पुणे महापालिका प्रशासनाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (PMC Standing Committee)

महापालिका कार्यक्षेत्रात होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आवश्यक नागरी सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पत विभागाकडून 84 किलोमीटरचे विविध रस्ते सुधारणा आणि संबंधित कामे तसेच विद्युत विभागामार्फत आवश्यक विद्युत कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात या स्पर्धेसाठी स्वतंत्र तरतूद नसल्याने विविध विकासकामांच्या अर्थशीर्षकांमधून निधीचे वर्गीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पथ विभागाकडे उपलब्ध असलेल्या विविध रस्ते विकास योजनांमधून निधी वर्ग करण्यात येणार आहे. यामध्ये आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, आंबेगाव पठारातील डीपी रस्ते, चिंतामणी ज्ञानपीठ ते महामार्ग मार्ग, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर परिसर, टेल्को कॉलनी, महाराणा प्रताप चौक ते राजे चौक मार्ग, साईसिद्धी चौक ते चिंतामणी ज्ञानपीठ रस्ता तसेच धनकवडी बसथांबा चौक विकास यांसारख्या विविध प्रकल्पांतील निधीचा समावेश आहे.

या प्रस्तावाला वित्तीय समितीची मान्यता मिळाल्याचे प्रशासनाने नमूद केले असून, आता स्थायी समितीमार्फत मुख्य सभेची मंजुरी घेतल्यानंतर निधीचे वर्गीकरण करून संबंधित कामांना गती दिली जाणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये ग्रँड सायकल टूरसाठी आंतरराष्ट्रीय दर्जानुसार दुरुस्त करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांवर काही महिन्यांतच पुन्हा खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे. गोखले चौक, पौड फाटा, वनाझ, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शनिवारवाडा, युनिव्हर्सिटी चौक, नळ स्टॉप आदी भागांतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाली असून, अनेक ठिकाणी ड्रेनेज चेंबरची झाकणे तुटल्याने वाहतूक सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांचे स्वतंत्र तांत्रिक गुणवत्ता लेखापरीक्षण करावे आणि डिफेक्ट लायबिलिटी पिरेडमध्ये असलेली सर्व खराब कामे संबंधित कंत्राटदारांकडून विनामूल्य दुरुस्त करून घ्यावेत असे निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर २०२७ च्या स्पर्धेसाठी होणारी सर्व रस्ते कामे गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या निकषांवरच पूर्ण करावीत, असा आग्रह भिमाले यांनी बैठकीत धरला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: