PMC API System | बांधकाम परवानगी प्रक्रियेसाठी ‘एपीआय’ प्रणाली; बाणेर-कोथरूडमध्ये पायलट प्रकल्प

Homeadministrative

PMC API System | बांधकाम परवानगी प्रक्रियेसाठी ‘एपीआय’ प्रणाली; बाणेर-कोथरूडमध्ये पायलट प्रकल्प

Ganesh Kumar Mule Jul 16, 2026 9:54 PM

FIEO – MITCON | जागतिक स्तरावर भारतीय निर्यातदारांना वाढत्या संधी | डॉ. अजय सहाय यांचे प्रतिपादन; ‘फिओ’ व ‘मिटकॉन’ यांच्यातर्फे ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’
MLA Sunil Kamble | गुलटेकडी च्या धर्तीवर काशेवाडी मधील नवीन एस आर ए प्रकल्प राबवला जावा | आमदार सुनील कांबळे यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 
Gadima | गदिमा स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा | पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

PMC API System | बांधकाम परवानगी प्रक्रियेसाठी ‘एपीआय’ प्रणाली; बाणेर-कोथरूडमध्ये पायलट प्रकल्प

 

PMC Standing Committee – (The Karbhari News Service) –  बांधकाम परवानगी प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी पुणे महापालिकेने भूमी अभिलेख विभागाच्या सहकार्याने ‘अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) आधारित प्रणाली लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारंभी बाणेर आणि कोथरूड परिसरात पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून, यासंदर्भातील सामंजस्य करारानुसार (एमओयू) आवश्यक कार्यवाहीसाठी स्थायी समितीची मान्यता घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. (Shrinath Bhimale PMC)

महापालिका आयुक्त आणि सेटलमेंट कमिशनर तथा संचालक, भूमी अभिलेख यांच्यात ३ जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत बिल्डिंग परमिशन जीआयएस-ॲज-अ-सर्व्हिस तंत्रज्ञानाचा वापर करून भूखंडाचे जिओ-रेफरन्सिंग, विकास आराखडा, डीपी झोनिंग आणि कॅडस्ट्रल नोंदी यांचे एकत्रित पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर अर्जदाराला प्रमाणित स्थानिक अहवाल उपलब्ध करून दिला जाईल.

या प्रणालीमुळे बांधकाम परवानगी प्रक्रियेदरम्यान आर्किटेक्टचा आराखडा, भूमी अभिलेख आणि विकास आराखडा यांची पडताळणी करण्यासाठी लागणारा वेळ, मनुष्यबळ आणि वारंवार करावी लागणारी तपासणी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा प्रशासनाचा दावा आहे.

पायलट प्रकल्पासाठी प्रत्येक अर्जदाराकडून पाच हजार रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार असून, याशिवाय बांधकाम क्षेत्रासाठी प्रति चौरस फूट तीन रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्काची रक्कम पुणे महापालिका, भूमी अभिलेख विभाग आणि संबंधित तंत्रज्ञान कंपनी यांच्या संयुक्त ‘एस्क्रो’ बँक खात्यामार्फत व्यवस्थापित केली जाणार आहे.

महापालिका आयुक्तांनी या कार्यपद्धतीला यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून, आता एमओयूनुसार प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यात येणार आहे. पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर ही प्रणाली संपूर्ण शहरात टप्प्याटप्प्याने लागू करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: